Kiran Mane Facebook Post for Uddhav Thackeray Google
मनोरंजन

'खरं सांगू उद्धवजी,मला लै आनंद झाला'; किरण मानेच्या पोस्टची चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर मतप्रदर्शन केलं आहे.

प्रणाली मोरे

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या नऊ-दहा दिवसांपासून मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेना पक्षाला त्यांच्याच आपल्यांनी मोठा धक्का दिला अन् वाघासारख्या पक्षाच्या,पक्षातील उर्वरीत कार्यकर्त्यांच्या अन् त्या पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्याच्या पायाखालची जमीनच सरकली. खूप विचारांती आपल्याच माणसांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनं अख्खा महाराष्ट्र हळहळलेला दिसला. सर्व स्तरातून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर(resignation) प्रतिक्रिया उमटत आहेत. कुणाला त्यांच्या राजीनाम्याचा आनंद झालाय तर कुणाला दुःख. मनोरंजन क्षेत्रातूनही अनेक सेलिब्रिटींनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर पोस्टच्या माध्यनातून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.(Kiran Mane Facebook Post for Uddhav Thackeray)

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे,अन् आपल्या पोस्टच्या माध्यमातून राजकीय,सामाजिक विषयांवर उघडपणे भाष्य करणारे अभिनेते किरण माने(Kiran Mane) नेहमीच चर्चेत पहायला मिळतात. आता त्यांचे नाव गाजतेय ते उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी केलेल्या पोस्टमुळे. त्यात त्यांनी म्हटलंय, ''उद्वजी खरं सांगू,आज लै आनंद झाला....'' आता हे नेमकं किरण माने कुठल्या भावनेनं बोलतायत हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असेल. चला तर,त्यांची सविस्तर पोस्ट काय आहे ते पाहूया.

Kiran Mane facebook post-Photo share by actor

किरण माने यांनी आपल्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे दिसत आहेत. तो फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,…''उद्धवजी, एकच शब्द : ‘ग्रेसफुल’! सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नावाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव खूप छोटं. त्यात गांवापासून लांब शेतात एकाकी असलेलं घर. गावाकडची साधी मानसं, राजकारणाशी-कुठल्या पक्षाशी काहीही संबंध नाही. पोटापुरतं कमवायचं आणि दुनियादारीशी संबंध नाही. बऱ्याच दिवसानंतर जमीनीवर मांडी घालून जेवायला बसलो आणि ही बातमी दिसली…”

...कुनाचा विश्वास बसनार नाय, पन तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर, त्या घरातला एकेक मानूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजनांच्या डोळ्यांत पानी आलेलं मी काल माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या तरन्या लोकांपास्नं म्हातार्‍यांपर्यन्त प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं 'चांगला मानूस व्हता' !

उद्धवजी, खरं सांगू? मला लै आनंद झाला. का ते नंतर सांगतो.. पन तुमच्या आयुष्यात जे घडलं, ते नविन नाय. राजकारनात तर 'काॅमन' गोष्ट हाय. खर्‍या आयुष्यात गरीब असो वा श्रीमंत... सामान्य मानूस असो वा सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर पराभवाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. विश्वासघाताचं दु:खबी सगळ्यांना पचवावं लागतं. पन अशावेळी लै कमी लोक तुमच्यासारखे 'धीरोदात्त' असतात ! मी म्हनत नाय की तुमची चूक नसंलच. तुमच्याकडुन चुका झाल्याबी असतील. पन तरीबी जे घडलं ते 'मानूस' म्हनून उद्ध्वस्त करनारं होतं. तुम्ही आतनं 'तुटला' नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का?? जी मान्सं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आनली.. त्या मान्सांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का??? कुनी म्हनंल, 'ही राजकारनी लोकं लै पोचलेली असत्यात. सगळे सारखेच.' हे बी मान्य. तुमी लोक धुतल्या तांदळासारखे नसता. तरीबी मी फक्त 'मानूस' म्हनून विचार करतोय. मी स्वत: यातनं गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीबी ज्या संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता, तारस्वरात न किंचाळता, शांतपने पद सोडलंत, ती वृत्ती 'आजकाल' लै दूरापास्त झालीय.

मला आनंद याचा झालाय की तुमी आता लै लै लै भाग्यवान आहात. सहजासहजी कुनाला मिळनार नाय, आज एकाबी नेत्याकडं नसंल अशी एक गोष्ट तुमच्याकडं हाय... कुठली? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध - स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पन जे आहेत ते मनाच्या तळापास्नं 'तुमचे' आहेत. जितक्या नि:स्वार्थीपने तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकबी तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के 'प्यूअर' असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात !

तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीनारा मी ना शिवसैनिक, ना राजकारनी. तुमी आयुष्यात कुठली मदतबी मला केलेली नाय आनि मी ती अपेक्षा बी कधी ठेवली नाय. तरीबी मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची 'ॲचिव्हमेन्ट' आहे !

लब्यू उद्धवजी. ❤️

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT