Kiran Mane Facebook
मनोरंजन

'कच्च्या गुरुचा चेला नाय; तुका म्हणे रणी...' किरण मानेंची नवी पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत असंही किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई - अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर आता सोशल मीडियावरून आणखी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी प्रॉडकशन हाऊसकडून आता आणखी मोठा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. किरण माने हे सातत्यानं आपली राजकीय भूमिका तसंच मते सोशल मीडियावरून व्यक्त करत असतात. मात्र यामुळेच त्यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकले. यानतंर आता विविध स्तरातून किरण मानेंना पाठिंबा दिला जात आहे.

मालिकेतील कलाकारांकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यता आली आहे. त्याबाबत बोलताना किरण माने म्हणाले की, प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे. ते बिचारे पोटार्थी आहे.

काय म्हणालेत किरण माने?

आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..

आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत...अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे... करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !

पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!!

किरण मानेंच्या बाजुने दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यासह अभिनेत्री अनिता दाते यांनीही पोस्ट केली आहे. तर काल किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास दीड तास झालेल्या या भेटीत किरण माने यांनी चॅनेलकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल तसेच आरोपांचे पुरावेदेखील दाखवल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT