मनोज जरांगेंचा सध्या महाराष्ट्र दौरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंना महाराष्ट्रभर सभा घेत लोकांना संबोधित करत आहेत.
मनोज जरांगेंची साताऱ्यात सभा झाली. त्यावेळी अभिनेते किरण माने यांनी जरांगेंचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केलीय. काय म्हणाले माने? बघूया.
(kiran mane praised Manoj Jarange patil for his Rajdhani Satara sabha)
किरण मानेंनी सभेचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओखाली किरण माने लिहीतात, "जरांगे पाटलांची राजधानी सातार्यातली सभा राजासारखी झाली... देखणी... रूबाबदार. मी खेडेगांवात लहानाचा मोठा झालोय. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणं किती सहजशक्य असतं, हे मी डोळ्यांनी पाहिलंय. कशा जीपा,ट्रक,टेम्पो भरून माणसं सभेला नेली जातात... कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितीय... अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापास्नं, स्वत:हून घरातनं उठून सभेला जाऊन बसणारी माणसं बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन-दोन वाजेपर्यन्त त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही."
किरण माने पुढे लिहीतात, "...मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे. आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहीती आहे. आरक्षणाचा लाभ घेणार्या इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, 'इतर जातीजमातींना दुखवू नका. ही नेत्यांनी निर्माण केलेली दुफळी आहे. मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत.' असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे."
किरण माने शेवटी लिहीतात, "संविधान दिन जवळ आलाय. त्याचवेळी एका सामान्य नागरीकाच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, संविधानिक मार्गाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं रहाणं ही खूप प्रेरणादायी घटना आहे. जय शिवराय... जय भीम."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.