Ganesh Utsav 2023: सध्या सगळीकडे गणेश उत्सव उत्साहात साजरा होत आहे. गणेश उत्सव अनेक कुटुंब त्यांच्या घरीही साजरा करतात. अशातच किरण मानेंनी सोशल मिडीयावर एका मुस्लिम कुटुंबाची कहाणी सांगितली आहे.
किरण माने लिहीतात,"जनाब समीर हुसेन संदे या मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गम्पतीबाप्पाचा फोटो बघून लै लै लै भारी वाटलं भावांनो ! समीरभाई माझे फॅन असल्याचा अभिमान वाटला. कारन हे हायेत आपले खरे संस्कार... आन् हीच हाय आपल्या संविधानातली 'बंधुता' !रेठरे बुद्रूक गांवातला आमचा समीरभाई म्हन्जे कवीमनाचा संवेदनशील मानूस. ज्या भक्तीभावानं तो अल्लाहची इबादत करतो, तेवढीच अदब तो गणपतीची पूजा करतानाबी ठेवतो.
(kiran mane share special post on muslim family celebrate ganesh utsav 2023)
किरण माने पुढे सांगतात, "रमज़ानमध्ये रोज़ा ठेवन्यासोबतच नवरात्रीत उपास करनं हा बी आपला 'फ़र्ज़' मानतो. अशा नादखुळा मानसाचा 'ज़मीर' किती निर्मळ, नितळ आसंल गड्याहो !ही अख्खी फॅमिलीच लै लै लै जबराट हाय. समीरभाईचे वडिल पै. हुसेनभाई यांच्या जोपर्यन्त जीवात जीव होता... पाय साथ देत होते... तोपर्यन्त किल्ले मच्छिन्द्रगडवरची मच्छिन्द्रनाथाची दर रविवारची पहाटेची आरती त्यांनी कधी चुकवली नाय !मला राहून-राहून वाटतं रेठरे बुद्रुक गांवाला 'मानवता जपनारं लोभस गांव' म्हनून पुरस्कारच देऊन टाकावा. अहो, खरंच या गांवाचे एकेक किस्से म्हन्जे द्वेषाचं विष पसरवू पहानार्यांना सन्नकन् कानाखाली हानल्यागत हाय."
किरण माने पुढे सांगतात. "रेठऱ्याच्या जोतिबाची पालखी दरवर्षी दसऱ्याच्या जागराला निघते. या पालखीचा मान आजबी मुस्लिम समाजाला हाय ! रेठऱ्यात रहिमतबुवा आन् पीर साहब यांच्या दोन छोट्या दर्गा हायेत. तिथं हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेनं चादर चढवताना आन् दुवा मागताना दिसतात.याच रेठर्यातले गनीभाई, ज्यांना 'प्यारन भाभीचा गनी' म्हनायचे, ते एकतारी भजनातले 'नुसरत फ़तेह अली ख़ान' होते. अशा खनखनीत आवाजात पांडुरंगाला साद घालायचे की साक्षात इठूराया भजनात यिवून नाचून जात आसंल ! त्यांचेच जिगरी दोस्त, रेठर्याचेच रामभाऊ सातपुते दरवर्षी न चुकता रमज़ानच्या महिन्यात रोज़े धरत. "
किरण माने शेवटी लिहीतात, "रेठऱ्यात मानाचे तीन गणपती असतात. त्या गणपतींचा आगमन व पालखीचा मान 'नाभिक' समाजाला देन्याची परंपरा पूर्वीपास्नं चालत आलेली हाय.अजून काय सांगू? आज मानसामानसात फूट पाडू पहानार्या काळात, प्रेमाचा संदेश देनारं रेठरे बुद्रुक हे गांव महाराष्ट्रात आदर्श ठरावं असं हाय. रेठर्याच्या मातीतल्या माझ्या बांधवांना कळलंय, कृष्णामाईचं पानीबी तहान भागवताना कधी भेदभाव करत नाय... आन् चौकातलं वडाचं झाडबी सावली देताना जातधर्म बघून देत नाय. भेदाभेद आन् द्वेष हे रिकाम्या टाळक्यांनी उकरून काढलेले धंदे हायेत.म्हनूनच अकबर इलाहाबादी म्हनायचा,"मज़हबी बहस मैंने की ही नहीं 'फ़ालतू अक़्ल' मुझ में थी ही नहीं !"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.