Kiran Mane shared angry post about sagar barve who threating ncp chief sharad pawar sakal
मनोरंजन

Kiran Mane: 'तुझ्या घरचे.. तुझी जात..' शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेचा किरण मानेंकडून खरपूस समाचार

किरण माने यांनी सागर बर्वेचे चांगलेच कान उपटले..

नीलेश अडसूळ

kiran mane on sagar barve: गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण प्रचंड दूषित झालं आहे. राज्यात सुरू असलेली हिंदू मुस्लिम तेढ, दोन धर्मातील तनाव, दंगली आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे.

या गदारोळात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाली. तुमचाही दाभोलकर करू.. असे विधान त्यात केले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.

या तपासा दरम्यान ही धमकी नर्मदाबाई पटवर्धन नावाने बनावट सोशल मीडिया अकाऊंट वरून आल्याचे समजले. ही धमकी देणाऱ्या खऱ्या युवकाचे नाव सागर बर्वे असल्याचेही उघड झाले. त्याच्यावर आता कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच किरण माने यांनी एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे.

कारण किरण माने यांचे आणि सागर बर्वेची खास कनेक्शन आहे.. तेच त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

(Kiran Mane shared angry post about sagar barve who threating ncp chief sharad pawar)

किरण माने लिहितात की, 'सागर बर्वे... मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास ! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं.'

''नर्मदाबाई पटवर्धन' या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते.'

'गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्‍या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही.'

'तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? काहीजण तुझ्या जातीवर जातील. पण जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत.'

'चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव 'सागर' ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.'

पुढे किरण माने म्हणतात, 'अजूनही जागा हो माझ्या मित्रा. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकी बाळग. आपण माणसं आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं का काढायची???'

' याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत. सहज आठवलं म्हणून सांगतो.. 'बिगबाॅस सिझन चार' हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. सगळ्या टास्कचा बाप - सी साॅ टास्क !'

'माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर - माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं. तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं 'सत्व' हलवू शकत नाही.'

'सोशल मिडीयावर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेन्ट करणार्‍या फेक अकाऊंटस्ना घाबरत नाही मी. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला 'रूतबा' कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात, कारण आपल्या शब्दांना, विचारांना आणि त्या विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात.'

' त्यामुळं असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं...शत्रूवर नजर रोखायची...आणि गालातल्या गालात हसायचं..'पठाण'मधल्या शाहरूखसारखं.क्यों की हमारी ताकत का अंदाजा हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलता है !' अशा शब्दात किरण माने यांनी सागर बर्वे याचे कान उपटले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT