Kiran Mane On Shahrukh Khan Jawan  Esakal
मनोरंजन

Kiran Mane: "तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवण्याचा प्रयत्न झाला", किरण मानेही 'जवान'चा फॅन! पोस्ट करत म्हणाला, " लब्यू शारख्या "

Vaishali Patil

Kiran Mane On Shahrukh Khan Jawan शाहरुख खानचा 'जवान' हा 2023 या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा प्रिव्ह्यू आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जवान चित्रपट पाहण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आता या चित्रपटाची चर्चा शिगेला पोहोचली आहे. जवानचे अॅडवान्स बुकिंगही सुरू झाले आहे.

जवानची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. त्यातच शाहरुखची भुरळ भल्याभल्या कलाकारांना पडली आहे. त्यातच आता मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने याने देखील शाहरुख खानसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शाहरुख खानचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

किरण माने सोशल मिडीयावर विविध पोस्ट शेअर करत असतो. अनेक राजकीय, सामाजिक, कलात्मक विषयावर किरण माने त्याची परखड मतं शेअर करतो. त्यातच आता शाहरुख खानच्या जवानची क्रेझ पाहता त्यांनी पोस्ट शेयर करत शाहरुखच्या चित्रपटाबद्दल त्याचे मत मांडले आहे.

पोस्टमध्ये माने लिहितो की, "शाहरख खानचा फोटो शेयर करत किरण माने लिहितो की, "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर !"

अग्ग्गाय्यायायाया... अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा ! पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच भन्नाट,जबराट,नादखुळा.

...तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस.

...ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास.

...तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर 'बाजीगर' ! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती 'क़ातिल' नजर रोखून.

आजबी तुझ्या 'मन्नत'पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात... तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात... त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच 'अस्सल' भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात...येडी होत्यात.

जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू.

तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर 'मानूस' म्हनूनबी तू 'किंग' हायेस ! ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हाॅस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वाॅर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवाॅर्ड मिळवलंयस. साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो !

'पठाण'च्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते. पठाण सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता तुझा 'जवान' मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा... होऊ दे जाळ न् धूर संगट... चिखलात धुरळा, पान्यात आग काढ... आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. 'पठाण'सारखा परत परत बघनार. लब्यू भावा."

किरण मानेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या पोस्टला कमेंट केल्या आहेत. किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेत अभिनय करत आहे. तर शाहरुख खानचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidansabha: हरियाणा नंतर आता राष्ट्रीय पक्षांचे 'मिशन महाराष्ट्र'; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी करणार दौरे

NA Tax : सोसायट्यांचा ‘एनए टॅक्स’ अखेर रद्द; दोन लाखांहून अधिक सोसायट्यांना दिलासा

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

SCROLL FOR NEXT