kiran mane shared post about pandharichi vari on muslims enters in trimabkeshwar temple sakal
मनोरंजन

Kiran Mane: तेव्हा वारीतल्या दिंड्या दर्ग्यात विसावतात.. 'त्र्यंबकेश्वर' प्रवेश प्रकरणावर किरण माने रोखठोक

सध्या त्र्यंबकेश्वर प्रकरणावर 'हिंदू-मुस्लिम' तेढ निर्माण केली जात आहे.

नीलेश अडसूळ

kiran mane on trimbakeshwar temple matter: सध्या महाराष्ट्रात 'त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश' प्रकरण चांगलंच तापलं आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे स्थानिक मुस्लिम गावकऱ्यांचा संदल सुरू होता. यावेळी प्रथेप्रमाणे तिथल्या मुस्लिम बांधवांनी महादेवाला धूप दाखवला.

पण परंतु यावर आता चांगलंच वातावरण तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुस्लिम समाजातील लोकांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले आहे .

एकीकडे हिंदुत्ववादी संघटना, ब्राह्मण महासंघ यावरून पेटून उठले आहेत. तर काही लोक हिंदुत्ववादी संघटनांच्या कृत्यावर सडकून टीका करत आहे. या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा असताना चुकीचा संदेश देऊ नका, माणसामाणसात द्वेष परसवू नका, असे सांगितले जात आहे.

याच प्रकरणावर किरण माने यांनी पंढरीच्या वारीचे उदाहरण देऊन अत्यंत सडेतोड आणि कान टोचणारी पोस्ट शेयर केली आहे. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक वर्षानुवर्षे वारीतून चालत आलं आहे याचं उत्तम प्रमाण किरण माने यांनी दिलं आहे.

(kiran mane shared post about pandharichi vari on muslims enters in trimabkeshwar temple)

किरण माने म्हणतात. ''वारी' ही लै लै लै नादखुळा गोष्ट हाय. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच 'टाईमपास' म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाय. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो.''

''...याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबत्यात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करत्यात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजत्यात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.''

''...विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही 'अदा' होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेत्यात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करत्यात !! एरवी सहज दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येत्यात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.''

''संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना कायतरी 'मेसेज' द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.''

''ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला 'भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला... तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर 'आपलंच' डोकं हाय...'' अशा शब्दात किरण माने यांनी सर्वांचे कान टोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT