Kiran Mane shared post about sant tukaram maharaj palakhi makers from muslim community  sakal
मनोरंजन

Kiran Mane: तुकोबारायांची पालखी सजवायचं काम मुस्लीम बांधव करत आहेत, पण.. किरण माने यांची सणसणीत पोस्ट..

सध्याच्या जातीभेद आणि धर्म भेदाच्या परिस्थितीवर किरण माने यांचं चोख उत्तर..

नीलेश अडसूळ

kiran mane on tukaram maharaj palakhi : सध्या महाराष्ट्रात प्रचंड धर्मद्वेषी वातावरण निर्माण झालं आहे. नुकतीच कोल्हापुरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एकूणच हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये तेढ वाढली आहे, किंवा ती निर्माण केली जात आहे.

मध्यंतरी त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे मुस्लिम बांधवांनी धूप जाळला म्हणून मोठा राडा हिंदुत्व वादी संघटनांकडून करण्यात आला. त्यात आता रोज नवा हिंदू मुस्लिम वाद समोर येत आहेत.

पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. इथे कित्येक वर्ष हिंदू मुस्लिम एकत्र नांदत आहेत. हेच सांगणारी एक सणसणीत पोस्ट किरण माने यांनी शेयर केली आहे.

पंढरीच्या वारीतील तुकाराम महाराजांच्या पालखीचे उदाहरण देऊन अत्यंत सडेतोड आणि कान टोचणारी पोस्ट शेयर किरण माने यांनी केली आहे. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक वर्षानुवर्षे वारीतून चालत आलं आहे याचं उत्तम प्रमाण किरण माने यांनी दिलं आहे.

(Kiran Mane shared post about sant tukaram maharaj palakhi makers from muslim community )

किरण माने यांनी लिहिले आहे की, 'तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय... हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी !'

'देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत...'

'तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. "तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो." असं या कारागीरांचं म्हननं हाय.'

पुढे किरण माने म्हणतात, 'रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली... तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करन्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्डमधी नाय गड्याहो.'

'आजच्या नासलेल्या भवतालात, "भेदाभेद भ्रम अमंगळ" हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आनि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय !' अशी पोस्ट शेयर करत किरण माने भरकटत चाललेल्या समाजाला आपल्याच संस्कृतीची आठवण करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT