kiran mane shared viral meme about hindu muslim relation  SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: "भारतात मुस्लिम आहेत म्हणुन तुम्ही हिंदू", किरण मानेंनी मीम शेअर करत लिहिली भानावर आणणारी पोस्ट

Devendra Jadhav

किरण माने हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. किरण माने यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमे, नाटकांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

किरण माने हे सोशल मिडीयावर विविध पोस्ट शेअर करत असतात. अनेक राजकीय, सामाजिक, कलात्मक विषयावर किरण माने त्यांची परखड मतं शेअर करत असतात. नुकतंच मानेंनी हिंदू - मुस्लिम संबंधी एक मीम शेअर केलाय. त्याची खुप चर्चा झालाय.

(kiran mane shared viral meme about hindu muslim)

किरण माने यांनी शेअर केलेल्या मीममध्ये जोकर दिसतोय. त्यावर लिहिलं आहे, भारतात मुस्लिम आहे म्हणुन तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार आहात.

जितेंद्र रायकर यांनी बनवलेला हा मीम किरण मानेंनी शेअर केलाय. हा मीम शेअर करुन माने लिहितात, ...हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा

नेटकऱ्यांनी किरण मानेंच्या पोस्टवर केलेल्या कमेंट

"हिंदू धर्मात जातीवादाची दुर्गंध आहे."

"खूप खोल अर्थ आहे ... थोडासा आपल्या बहुजनांनी विवेक जागा ठेवला पाहिजे...."

"माने सर ! खुप छान आणि समर्पक विचार आहे.."

" खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी " सौ पतेकी बात !

"अगदी बरोबर डायरेक्ट मुळावर घाव."

अशा पोस्ट करत नेटकऱ्यांनी किरण मानेंच्या पोस्टवर कमेंट केल्यात

किरण माने सध्या कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिकेत अभिनय करत आहेत. किरण माने यापुर्वी बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होते.

सध्या कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिका चांगलीच चर्चेत आहे. काहीच दिवसांपुर्वी ही मालिका सुरु झालीय. या मालिकेत किरण माने सिंधुचे वडील अभिमान साठेंची भुमिका साकारत आहेत.

या मालिकेच्या निमित्ताने एका बापाच्या आत असलेल्या हळव्या मनाला मालिकेत साद घातली आहे. ही भुमिका साकारतानाचे विलक्षण अनुभव किरण माने सोशल मिडीयावर शेअर करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू- सुप्रिया सुळे

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT