kiran mane special post on mahatma gandhi jayanti programme in pune kothrud SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: "इडीच्या भीतीने भलेभले लाचार!", गांधी जयंती निमित्त पुण्यात किरण मानेंचा खास परिसंवाद, वाचा सविस्तर

यंदाच्या गांधी जयंतीनिमित्त किरण माने दिग्गज विचारवंतांसोबत पुण्यात खास परिसंवाद घेणार आहेत

Devendra Jadhav

संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.

यानिमित्ताने पुण्यात खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेय. या परिसंवादात किरण माने सहभागी होणार आहेत.

या विशेष परिसंवादाच्या निमित्ताने किरण मानेंनी खास पोस्ट लिहीली आहे. माने लिहीतात, ""अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो यहाँ होता न… तो ये डरे हुए लोगों का देश देख के बहुत रोता था यार !" लगे रहो मुन्ना भाईमधला मुन्नाभाईचा हा डायलाॅग त्यावेळी फक्त आवडला होता. आजच्या काळात रोज आठवून अंगावर शहारा येतो...

(kiran mane special post on mahatma gandhi jayanti)

किरण माने पुढे लिहीतात "...खरंच हा देश 'डरे हुए' किंवा 'डराए गये' लोगोंका देश झालाय यात शंका नाही. भल्याभल्या वाघांची शेळी झालीय. नेत्यांपास्नं सामान्य जनतेपर्यन्त सगळीकडे आज भेदरलेले लोक दिसतात. इडीच्या भितीनं भलेभले गामा लाचार होऊन, विचारधारेची सुरळी करून गपगुमान या कळपातनं त्या कळपात जाऊ लागलेत. आपली लफडी-कुलंगडी बाहेर काढून, आजवर दाबलेल्या फायली ओपन केल्या तर? तिथपास्नं ते सामान्य माणूसबी हादरलाय. ही पोस्ट केली तर मला अर्वाच्य शब्दांत ट्रोल तर करणार नाहीत ना? ती कमेन्ट केली तर मला मेसेंजरमध्ये धमक्या तर येणार नाहीत ना? ते विधान केले तर मला कामावरून काढून तर टाकणार नाहीत ना? या भितीनं अन्याय सहन करून मूग गिळून गप्प बसलेले लोक जागोजागी दिसताहेत..."

सद्य स्थितीवर महिलांवर होणारे अत्याचार बघून माने लिहीतात, "मग स्त्रियांना विवस्त्र करुन धिंड काढलेली काळीज पिळवटणारी घटना घडूदेत किंवा बलात्कारीत मुलगी रक्तबंबाळ होऊन मदत मागत रस्त्यावरून फिरतानाचं विदारक दृश्य दिसूदेत... महागाई-बेरोजगारीनं कंबरडं मोडूदेत किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कुणा निरपराध्याची हत्या घडवुन आणली जाऊदेत... मिडीयासकट सगळे चिडीचूप आहेत. केली बातमी, अन् नोकरी गेली तर? शेवटी पोटापाण्यावर आल्यावर काय करणार माणूस?"

पुण्यात होणाऱ्या परिसंवादाचे तपशील सांगताना माने लिहीतात, "सगळीकडे फक्त भिती, भिती आणि भितीचं साम्राज्य आहे... अशा परिस्थितीत गांधी जयंती सप्ताह साजरा करताना परीणामांची पर्वा न करता भवतालावर, सद्यस्थितीवर निर्भिडपणे बोलून ती साजरी करण्याची ही कल्पना लै आवडली मला. यात डाॅ. मणिंद्रनाथ ठाकूर, पी. साईनाथ, सुधींद्र कुलकर्णी असे अनेक मान्यवर बोलणार आहेत. पुण्यात 'गांधी भवन'मध्ये होणार्‍या या सप्ताहातल्या एका परीसंवादात बोलायला मलाही आमंत्रित केलेय..."

किरण माने शेवटी लिहीतात, "खरंतर कुमार सप्तर्षी, विजय चोरमारे, श्रीराम पवार अशा दिग्गजांसोबत मी काय बोलणार? अनुभवाने,ज्ञानाने आणि वयानेही यांच्यापेक्षा मी खूप लहान आहे. तरीही हा सन्मान मी तेवढ्याच नम्रपणे स्विकारला आहे... माझ्या कुवतीनुसार मी मन मोकळं करणार आहे... कारण पुढे जाऊन या भयाण काळाच्या आठवणी निघतील, तेव्हा माझ्या पुढच्या पिढ्यांनी माझ्याबद्दल अभिमानानं सांगीतलं पायजे, "उस ज़माने में, ख़ौफ़ के माहौल में भी हमारा बंदा 'डरा' नहीं था... खूंखार दरींदों के सामने झुका नहीं था... मानवता का झंडा हाथ में लिए, 'सच' के साथ डट के खडा था !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT