kiran mane support manoj jarange patil on maratha reservation SAKAL
मनोरंजन

Kiran Mane on Manoj Jarange Patil: "उतावळेपणा करायच्या आधी..", मराठा आरक्षणासंदर्भात किरण मानेंची पोस्ट चर्चेत

किरण मानेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांविषयी पोस्ट लिहिलीय

Devendra Jadhav

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच जोर धरु लागलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.

अशातच बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी मराठा आरक्षणाला उद्देशुन एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. ती चर्चेत आहे.

किरण माने यांनी साताऱ्यात चाललेल्या मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या व्यक्तींना सपोर्ट करण्यासाठी त्यांना भेट दिली. किरण माने लिहीतात, "सातार्‍यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून. सगळ्या पाहुणेमंडळींबरोबर थोडा वेळ बसलो. त्यात कोडोलीतले ७५ वर्षांचे तात्या सावंत दोन दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यांना 'तब्येतीची काळजी घ्या' अशी विनवणी केली पण ऐकायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता 'करो या मरो' या स्टेजवर आलाय. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची लै काळजी वाटायला लागलीय. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या... इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो !"

किरण माने पुढे लिहीतात "...आपली ताकद मोठी हाय. शांततेत काम केलं तरी पुरेसं हाय. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीबी माजलेला असला तरी एका डरकाळीत जाग्याव थरथरला पायजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे?

जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. यश मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाय आपला मराठा गडी, असा आत्तातरी पूर्ण विश्वास वाटतोय ! फक्त अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही गोष्टींची काळजीही वाटते आहे. असो. आपण सध्या तरी फक्त 'पाॅझीटिव्ह' विचार करूया. जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे रहाणं गरजेचं हाय."

किरण माने शेवटी लिहीतात, "माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत हाय ! योग्य ठिकानी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा. आपन आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार... आपण मिळवणारच...कुनाचा बाप ते थांबवू शकत नाय ! जय जिजाऊ... जय शिवराय... जय भीम."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bala Nandgaonkar: चक्क राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार! बाळा नांदगावकर यांनी का केली ही भविष्यवाणी?

Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

SCROLL FOR NEXT