Kiran Mane on Dancer Gautami Patil: Esakal
मनोरंजन

Kiran Mane: ‘पाटलीण’ हायेस..रुबाबात नाच', आडनावावरच्या वादात किरण मानेंचा गौतमीला फुल सपोर्ट! टिका करणाऱ्यांची लाजच काढली

Vaishali Patil

Kiran Mane on Dancer Gautami Patil: सबसे कातिल गौतमी पाटील हे शब्द तुमच्या कानावर नक्कीच पडले असतील. असा एक दिवस जात नाही की गौतमी चर्चेत येत नाही. तिच्या इतकी प्रसिद्धि तर कुण्या नेत्याला किंवा अभिनेत्यालाही नाही असं काहीस चित्र महाराष्टात सध्या आहे.

मात्र आता याच कातिल गौतमी पाटीलच्या पाटील या आडनावावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. गौतमीनं 'पाटील' आडनाव बदलून घ्यावं अन्यथा तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका एका मराठा संघटनेने घेतली आहे.

तर यावर मी 'पाटील' आहे, तर पाटीलच लावणार आहे, असं सडेतोड उत्तर देत आता कुणीही माझ्याबद्दल काहीही बोलत आहे. त्यामुळे आता मला कसालाच फरक पडत नाही अशी भुमिका गौतमीनं घेतली.

आता या प्रकरणावर अनेक प्रतिक्रियादेखील समोर आली. त्यातच तिच्या गावातील लोकांनीही गौतमीला पाठिंबा दिला. मात्र गौतमीबद्दल मनोरंजन विश्वातील कलाकार मौन बाळगून होते. त्यातच आता यावर सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय प्रश्न ते त्याचं परखड मत मांडत असतात. त्यातच आता त्यांनी गौतमीच्या पाटील आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर एक पोस्ट शेयर केली आहे.

गौतमीचा फोटो शेयर करत त्यांनी लिहिले की, …”एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.

चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.

गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्‍यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्‍या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात.

तू ज्या अदाकार्‍या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे..

तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्युलर आहेस. तू हे यश एंजॉय कर. बर्‍याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्‍यांना उंच उंच लांब उडवून लाव.

आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच !”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT