Kiran Rao Interview viral news esakal
मनोरंजन

Kiran Rao : 'लाल सिंग चढ्ढा' फ्लॉप झाल्यानंतर काय होती 'आमिर'ची पहिली प्रतिक्रिया? किरण रावनं केला खुलासा!

लाल सिंग चढ्ढा पडला आणि आमिरला मोठा धक्का बसला. किरण रावनं याविषयी सविस्तर त्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

युगंधर ताजणे

Kiran Rao : आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढावरुन खूप वाद झाला होता. एकतर हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप नावाच्या चित्रपटाचा तो हिंदी रिमेक होता. त्या आणि लाल सिंग चढ्ढामध्ये कोणताही फरक नव्हता. या उलट अनेकांनी फॉरेस्ट गंप आणि लाल सिंग चढ्ढाची तुलना करुन त्यापेक्षा टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप किती श्रेष्ठ होता अशी वक्तव्यं केली होती.

सध्या आमिर खानची एक्स वाईफ किरण राव ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. लापता लेडीज असे त्या चित्रपटाचे नाव असून त्या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. अखेर तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतात प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट जगभरातील विविध देशांमधील महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

या सगळ्यात किरण राव ही तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून यावेळी तिनं काही वक्तव्यं आणि खुलासे केले आहेत त्यामुळे ती चर्चेत आली आहे. लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची काय प्रतिक्रिया होती हे तिनं सांगितलं आहे. खरं तर आमिर खाननं लाल सिंग चढ्ढानंतर त्यावर फारसं बोलणं टाळलं होतं. त्याचे म्हणणे एवढेच की, प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो मान्य करावा लागेल.

आमिर खान आणि करिना कपूर यांची महत्वाची भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या होत्या. या सगळ्याचा आमिरच्या मनावर खूप परिणाम झाला होता. तो खूप निराश होता. असे किरणनं म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.त्यानंतर तो ओटीटीवरही रिलिज झाला.

काय म्हणाला होता आमिर?

झुमला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये किरण रावनं म्हटले आहे की, एक तर तो चित्रपट आमिरसाठी ड्रीम प्रोजेक्ट होता. तो अयशस्वी झाल्यानंतर त्याला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले होते. आम्ही खूप दिवसांपासून त्याच्या स्क्रिप्टसाठी प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर त्यावरुन खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मला माहिती आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास अयशस्वी झाला. त्याचा फटका बसला.

लाल सिंग चढ्ढासोबत जे काही झालं ते खूपच वाईट होतं. त्याचा आमिरला धक्का बसला होता. तुम्ही खूप प्रयत्न करता आणि त्यातून तुमच्या हाती निराशा येते त्यावेळी खूपच वाईट वाटू जाते. तसे लाल सिंग चढ्ढाच्यावेळी झाले होते. अशी प्रतिक्रिया किरण रावनं दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT