kiran rao, reena dutta,aamir khan  ESAKAL
मनोरंजन

Kiran Rao: "लोक आम्हाला मॉडर्न फॅमिली म्हणतात"; रीना दत्तासोबतच्या मैत्रीबद्दल बोलली किरण राव

priyanka kulkarni

Kiran Rao: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर आणि रीना दत्ता (Reena Dutta) यांची मुलगी आयराचा काही दिवसांपूर्वी लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात किरण राव आणि रीना दत्ता या एकत्र दिसल्या. नुकत्याच एका मुलाखतीत किरण रावनं (Kiran Rao) रीनासोबत असलेल्या तिच्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे.

काय म्हणाली किरण?

नुकत्याच एका मुलाखतीत किरणनं सांगितलं, "जेव्हा रीना आणि मी बाहेर फिरायला जातो तेव्हा आमचे फोटो काढायला लोक गर्दी करतात. तेव्हा ते फोटोग्राफर्स आमिरपेक्षा आमचे फोटो काढण्यात जास्त इंटरेस्टेड असतात. रीना आणि मी मैत्रिणी आहोत, त्यामुळे आम्ही फोटोग्राफर्सला स्माईल देतो. ही आम्हाला इतकी मोठी गोष्ट वाटत नाहीये."

"लोक आम्हाला मॉडर्न फॅमिली, फॅमिली 2.0 असं म्हणतात, मला हे खूप आवडतं. ज्यांना त्यांच्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीसोबत मैत्री करायची आहे, त्यांना मी टिप्स देऊ शकते.", असंही किरण म्हणाली.

आमिरनं दोनवेळा थाटला संसार

आमिरनं 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केलं. रीना आणि आमिर यांनी आयरा आणि जुनैद खान ही दोन मुलं आहेत. 2002 मध्ये रीना आणि आमिरचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं 2005 किरण रावसोबत लग्न केलं. पण 2021 मध्ये आमिर आणि किरणचा घटस्फोट झाला. रीना आणि किरण यांना अनेकवेळा एकत्र स्पोट केलं जातं. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयरा खानच्या लग्नसोहळ्यात किरण आणि तिचा मुलगा आझाद यांनी हजेरी लावली होती.

किरणचा आगामी चित्रपट

किरण रावनं दिग्दर्शित केलेला लापता लेडीज हा चित्रपट 1 मार्च रोजी रिलीज होणार आहे. सध्या किरण या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव,प्रतिभा रंता,छाया कदम यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. लापता लेडीज या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT