Poet Kishor Kadam On Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे असं नाव आहे की त्या नावाला काही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. नेहमी वादग्रस्त वक्तव्य करायची अन् वाद निर्माण करायचा असं काही तरी ते करत असतात. संभाजी भिडे आणि वाद हे समिकरणचं झालं आहे असं बोललं तरी काही वावगं ठरणार नाही.
आता पुन्हा एकदा ते असचं बेतास वक्तव्य करुन अडचणीत सापडले आहेत. महात्मा गांधींबाबत त्यांनी हे वक्तव्य केलं. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं काहीसं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आणि त्यानंतर राज्यभरात नवीन वादाला तोंड फुटलं.
वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्यात त्यातच आता मनोरंजन विश्वातुनही कलकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यातच प्रसिद्ध अभिनेते आणि लोकप्रिय कवी किशोर कदम सौमित्र यांनीही फेसबूक पोस्ट करत भिडेंच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांना लवकरात लवकरत अटके करण्याची मागणी त्यांनी केली.
किशोर कदम सौमित्र त्याच्या पोस्टमध्ये लिहितात की, "अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणविसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे.तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे , मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे. "
त्यांची ही पोस्ट काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाली अनेकांनी त्यावर प्रतिक्रियादेखील दिली आहे. 'किशोर, असंख्य लोकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेस', 'अत्यंत सहमत आहे. विषवल्ली आहे ही' अशा अनेक पोस्ट करत त्याच्या मताशी सहमती दाखवली आणि त्यांना पाठिंबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.