salman khan Sakal
मनोरंजन

KKBKKJ Box Office: लवकरच 'किसी का भाई किसी की जान' 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई

सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

Aishwarya Musale

ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाची सुरुवात संथ होती, परंतु आठवड्याच्या शेवटी, आश्चर्यकारक कामगिरी केली आणि बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कलेक्शन केले. मात्र, वीकडेजमध्ये 'किसी का भाई किसी की जान'च्या कमाईत घट झाली आहे. जाणून घेऊया चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी किती कमाई केली?

'किसी का भाई किसी की जान' हा अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण चित्रपट आहे. सलमानच्या शैलीतील या चित्रपटाची जादू चाहत्यांना वेड लावत आहे आणि याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की या चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत 78.34 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर जगभरात 'किसी का भाई किसी की जान'ने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

यासोबतच चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या म्हणजेच पहिल्या मंगळवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. मात्र, पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, 'किसी का भाई किसी की जान' ने मंगळवारी फक्त 7.50 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन 85.34 कोटी रुपये झाले आहे. मात्र, अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये काही फरक जाणवू शकतो.

सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. या बॉलीवूड सुपरस्टारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूम ठोकतात. समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसला तरी सलमान भाईचा चित्रपट त्याच्या चाहत्यांना आवडतो.

'किसी का भाई किसी की जान' ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला पण चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. आता 'किसी का भाई किसी की जान' 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पावले दूर आहे. या वीकेंडला हा चित्रपटही हा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT