Salman Khan Esakal
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan सिनेमा लवकरच 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज..जाणून घ्या सगळे अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' सिनेमागृहात ईदच्या दिवशीच रिलीज झाला आहे. सिनेमाच्या तिकिटीचा वधारलेला भाव पाहता कुटुंबासोबत सिनेमा पाहणं सर्वांनाच शक्य होणार नाही असं या सिनेमाच्या बाबतीत बोललं जात आहे.

त्यामुळे कदाचित अनेकजणांचा प्लॅन बनला असेल तो म्हणजे सिनेमा ओटीटीवर पहायचा. आणि आता कितीतरी सलमानचे चाहते प्रतिक्षा करत असतील की सलमानचा हा सिनेमा नेमका कोणत्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होतोय हे जाणून घेण्यासाठी.

चला जाणून घेऊया 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा नेमका कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie OTT Release Updates)

सलमान 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या माध्यमातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहे. अर्थात या आधी शाहरुखच्या 'पठाण' सिनेमातून कॅमियो रोलमध्ये सलमान दिसला होता. त्यामुळे आता त्याचे चाहते अर्थातच त्याचा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठीच उत्सुक असतील.

पण काही कारणानं कुणाला जर ते शक्य झालं नाही तर आता हा सिनेमा कुठल्या ओटीटीवर रिलीज होणार याविषयी असलेल्या चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचलेली दिसतेय. यादरम्यान बातमी समोर आली आहे की हा सिनेमा Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची चिन्ह आहेत.

माहितीसाठी इथे सांगतो की 'किसी का भाई किसी की जान' २०१४ मध्ये आलेल्या तामिळ अॅक्शन ड्रामा 'वीरम' सिनेमावर आधारित आहे. या सिनेमात सलमान खान व्यतिरिक्त साऊथ स्टार व्यंकटेश,पूजा हेगडे,शहनाझ गिल, पलक तिवारी,राघव जुयाल, भूमिका चावला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमानं पहिल्या दिवशी १२.५ करोडहून अधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT