K.J. Joy, the legendary Malayalam film music director, passed away at 77 in Chennai  SAKAL
मनोरंजन

K J Joy Passed Away: लोकप्रिय संगीतकार केजे जॉय काळाच्या पडद्याआड! २०० हून अधिक सिनेमांना दिलं संगीत

प्रसिद्ध मल्याळम संगीतकार केजे जॉय यांचं निधन

Devendra Jadhav

K J Joy Passed Away News: प्रसिद्ध मल्याळम संगीत दिग्दर्शक केजे जॉय यांचं निधन जगाचा झालंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉय यांनी सोमवारी चेन्नईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 77 वर्षे होते.

मल्याळम संगीताच्या जगात ते पहिले 'टेक्नो म्युझिशियन' म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 1970 च्या दशकात कीबोर्डसारख्या वाद्याचा वापर केला. जॉय गेल्या अनेक दिवसांपासून आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते.

संगीत दिग्दर्शका जॉय यांच्या पार्थिवावर बुधवारी चेन्नईत अंत्यसंस्कार होणार आहेत. जॉय यांच्या निधनाने मल्याळम संगीत जगताचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

FEFKA डायरेक्टर्स युनियन आणि मल्याळम पार्श्वगायक आणि संगीतकार एमजी श्रीकुमार यांनी जॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जॉय यांनी २०० हून अधिक सिनेमांना संगीत दिलंय.

जॉय यांनी 1975 मध्ये मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुढे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक गाण्यांना चाली दिल्या. जॉयच्या अनेक गाण्यांना संगीतप्रेमींनी प्रेम दिलं. जॉय यांच्यामुळे मल्याळम संगीताच्या जगात अनेक मोठे बदल घडले.

जॉयच्या प्रयोगांमुळेच मल्याळम चित्रपट संगीत विश्वात अनेक बदल घडून आले. जॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या 'जयन' चित्रपटातील संगीताने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

त्यांनी अनेक युवा गाणीही रचली. जॉय यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध संगीत दिग्दर्शकांसाठी सहाय्यक म्हणून काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT