बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात, मात्र यावेळी ते लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. याचं कारण म्हणजे, नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात एका चाहत्याला चापट मारली आहे. अभिनेत्याने चाहत्यासोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता नानांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दावा केला आहे की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्यांच्या चित्रपटातील सीन आहे.
नानांनी त्यांच्या एका चाहत्याला फटकावल्याचे दिसून आले आहे. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. तो चाहता नानांसोबत फोटो काढण्यासाठी पुढे येतो तेवढ्यात नाना त्याच्या डोक्यात मारुन त्याला तिथून पिटाळून लावतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मात्र नानांना ट्रोल केले आहे.
नाना पाटेकरांचा व्हिडिओ वाराणसीतील दशाश्वमेध घाटातील आहे. अभिनेता गेल्या अनेक दिवसांपासून येथे त्याच्या आगामी 'जर्नी' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दशाश्वमेध घाटाच्या वाटेवर नानांच्या 'जर्नी' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. कपडे आणि टोपी घालून नाना शूटिंगसाठी तयार झाले होते. नानांचे लक्ष शूटिंग आणि त्यांच्या संवादांवर होते.
तेवढ्यात मागून एक मुलगा आला आणि त्याने नानांना सेल्फी काढण्याची विनंती करायला सुरुवात केली आणि मग परवानगी न घेता नानासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली.नानाला त्या चाहत्याचे हे वागणे अजिबात आवडले नाही. त्याचा संयम सुटला आणि त्यांनी त्या मुलाच्या डोक्यात मारुन त्याला तिथून पिटाळून लावलं. मारल्यानंतर नानाही त्या मुलाला काहीतरी बोलताना दिसले. दरम्यान, चित्रपटाच्या क्रू मेंबरने या मुलाच्या गळ्याला पकडून त्याला तेथून दूर नेले. नाना पाटेकरांनी चाहत्यासोबत केलेल्या या वागणुकीमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नानांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
या व्हिडिओनंतर काही माध्यमांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, 'मला नुकतीच ही बातमी कळली आहे. मी आत्ता तोच व्हिडिओ पाहत होतो. नानांनी कोणाला मारलं नाही, तर तो माझ्या चित्रपटाचा सीन आहे. बनारसच्या मधोमध रस्त्यावर आम्ही त्याचे चित्रीकरण करत होतो. जिथे नानांच्या जवळ आलेल्या मुलाला डोक्यावर मारावे लागते. शुटिंग चालू होते आणि नानांनी त्यालाही मारले.
या व्हिडिओनंतर काही माध्यमांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, 'मला नुकतीच ही बातमी कळली आहे. मी आत्ता तोच व्हिडिओ पाहत होतो. नानांनी कोणाला मारलं नाही, तर तो माझ्या चित्रपटाचा सीन आहे. बनारसच्या मधोमध रस्त्यावर आम्ही त्याचे चित्रीकरण करत होतो. जिथे नानांच्या जवळ आलेल्या मुलाला डोक्यावर मारावे लागते. शुटिंग चालू होते आणि नानांनी त्यालाही मारले.
मात्र तेथे जमलेल्या इतर चाहत्यांनी ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि त्यानंतर चित्रपटाचा सीन लीक केला. आता सोशल मीडियावर नानांना नकारात्मक आणि असभ्य अभिनेता म्हणून ट्रोल केले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विनंती करतो की चाहत्यांनी या व्हिडिओचे सत्य समजून घ्यावे. हा चित्रपटाचा सीन आहे, नानांनी कोणाला मारहाण केलेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.