Koffee With karan7: Vicky Kaushal was never on my radar- Katrina Kaif Instagram
मनोरंजन

'विकी माझ्या विचारातही नव्हता,त्याच्याशी लग्न केलं ते...', कतरिना स्पष्टच बोलली

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ७' या चॅट शो मध्ये कतरिनानं पहिल्यांदाच विकी कौशलसोबतचं नातं,लग्न याविषयी स्पष्ट भाष्य केलं आहे.

प्रणाली मोरे

Katrina Kaif on her marriage with vicky kaushal: कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky kaushal) हे बॉलीवूडमधील क्यूट,हॅप्पी कपलपैकी एक. जिथे जातील तिथं सध्या दोघंही लाइमलाइट खेचून घेतायत. यांच्या लग्नाच्या बातम्या आणि त्यानंतरचे सगळे सोहोळे कितीतरी दिवस बातम्यांच्या हेडलाईनमध्ये झळकत होते. अनेकांना तर कतरिना-विकीचं जुळलं कसं,कधी यावर अगदी आतापर्यंत प्रश्न पडताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण7' शो मध्ये विकी-कतरिनानं आपल्या लव्हलाईफ-लग्नाविषयी पहिल्यांदा खुलासा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यात कतरिनानं विकीसोबतचं नातं,लग्न यावर जे विधान केलं आहे त्यानं सगळ्यांनाच हैराण करुन सोडलं आहे. कतरिना म्हणाली,''विकी माझ्या विचारातही नव्हता,फक्त माझ्या नशिबात तोच होता म्हणून आमचं लग्न झालं..'',असंच सहज म्हणून गेली कतरिना अन् लगोलग चर्चा रंगली. चला,सविस्तर जाणून घेऊया नेमकं काय म्हणाली आहे मिसेस. कौशल?(Koffee With karan7: Vicky Kaushal was never on my radar- Katrina Kaif)

'कॉफी विथ करण 7' च्या १० व्या एपिसोडमध्ये कतरिना आली होती. तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी देखील त्या एपिसोडमध्ये आले होते. या एपिसोडमध्ये कतरिनानं करणसमोर विकी आणि आपल्या नात्याविषयी अनेक गोष्टी स्पष्टपणे बोलून दाखवल्या. ती चक्क म्हणाली, ''विकी माझ्या विचारातही नव्हता,बस्सं माझ्या नशिबात होता म्हणून आमचं लग्न झालं. पण जे नशिबात लिहिलं होतं माझ्या ते चांगलं होतं असं मी आता म्हणेन''.

कतरिना पुढे म्हणाली,''मी विकीविषयी फक्त ऐकून होते. म्हणजे अशा नावाचा अभिनेता आहे वगैरे बस्स. पण कधी त्याला भेटण्याचा योग नव्हता आला, ना कधी त्याच्यासोबत कामाचा योग आला होता. पण जेव्हा आम्ही भेटलो,त्या पहिल्या भेटीतच त्याने मला जिंकून घेतलं''.

''झोया अख्तरच्या घरी आमची पहिली भेट झाली. आणि तिच पहिली व्यक्ती होती जिनं माझ्या मनात विकीविषयी खूप चांगल्या गोष्टी पेरल्या. झोयाच्या त्या पार्टीतच आमच्यातील सूर जुळले. त्यामुळे मी आमच्या नात्याविषयी म्हणेन, आमचं नातं जुळलं हे अगदी आमच्याही नकळत,ध्यानी-मनी नसताना''. कतरिना पुढे आपल्या नात्याविषयी थोडं स्पष्टच बोलली. ''माझ्या नशिबात विकी होता,आणि जे माझ्या नशिबात होतं ते चांगलंचं होतं. त्यावेळी खूप गोष्टी अचानक घडतायत असं मला वाटत होतं,अनेकदा वाटायचं...नाही हे खरं नाहीय. पण हो, ते घडत होतं,आणि माझ्याही नकळत मी त्यात बांधले गेले''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT