मुंबई : मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करत आहेत. तसेच समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो देखील ट्विट केला होता. त्यावरूनच आता त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकरने (kranti redkar letter to cm) मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांना हे मुळीच सहन झाल नसतं. आज बाळासाहेबांची प्रतिमा आम्ही तुमच्या बघतो, असं क्रांती तिच्या पत्रातून म्हणाली आहे.
क्रांती पत्रातून नेमकं काय म्हणाली?
''मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले आहे. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे दोघांनी शिकविलं. तोच धडा गिरवत आज मी एकटी माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया आणि त्यावरच लोक फक्त मजा बघतात. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं देखील नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लत्करं चार-चौघांत उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.''
''आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खसगी हल्ले हे राजकारणाचे नीच स्वरुप आहे. हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आज ते नाही पण, तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्या न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य ते न्याय करा ही विनंती''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.