Sameer Wankhede Kranti Redkar esakal
मनोरंजन

'त्यांना आता कळणार नाही'; वानखेडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी क्रांतीची पोस्ट

'मी नेहमी तुमच्याबद्दल, तुमच्या शौर्याचं वर्णन करण्यासाठी खूप काही लिहिते, परंतु..'

स्वाती वेमूल

आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे चर्चेत असणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने वानखेडेंच्या कामाचं कौतुक करत त्यांना पुढेही असंच लढत राहण्यास धीर दिला आहे. वानखेडेंवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावेळीही क्रांती समीरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि तिने वेळोवेळो सोशल मीडियाद्वारे उत्तरं दिली.

क्रांती रेडकरची पोस्ट-

'समीर वानखेडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी नेहमी तुमच्याबद्दल आणि तुमच्या शौर्याचं वर्णन करण्यासाठी खूप काही लिहिते, परंतु आज शब्द कमी पडतायत. देशातील अमली पदार्थांशी निगडीत दुष्टांशी लढा देणं ही एक गोष्ट आहे, परंतु तुमच्या या मोहिमेत तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणं हा एक मोठा संघर्ष आहे. या संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात आणि त्यावर दररोज तुम्ही मात करत आहात. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, समाजातील घाण दूर करत आहात, तरुणांना योग्य मार्ग दाखवत आहात, त्यांच्या भल्यासाठी काम करत आहात (आता कदाचित त्यांना ही बाब समजणार नाही). तुमच्यावर जनतेचा आशीर्वाद आहे. सामान्य माणूस हा खूप हुशार आहे. योग्य काय अयोग्य काय, कोण खोटं आणि कोण खरं हे त्याला बरोबर माहित असतं. तुम्ही फक्त काम करत राहा, अखंडता कशी दिसते ते जगाला दाखवा. जे लोक खरोखरच आपल्या समाजाची काळजी घेतात, आपल्या राष्ट्रावर प्रेम करतात आणि तुमच्यावर प्रेम करतात तेच लोक महत्त्वाचे आहेत', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT