kriti sanon birthday : how did kriti become actress, modelling, south films to bollywood  sakal
मनोरंजन

दाक्षिणात्य चित्रपटातून आलेली क्रिती सनन कशी बनली बॉलीवुडची परम सुंदरी..

अभिनेत्री क्रिती सनन हिचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने क्रिती विषयी थोडक्यात..

नीलेश अडसूळ

Kriti Sanon birthday : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हीचा आज (27 जुलै) रोजी वाढदिवस. क्रिती आपला 32वा वाढदिवस साजरा करत 33 व्या वर्षात पदार्पण करत आहे आहे. क्रितीच्या परम सुंदरी गाण्याने सर्वांनाच वेड लावले. अशा या परम सुंदरीने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. शिवाय तिचे अनेक सिनेमे हीट झाले आहेत. क्रितीला मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतः वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास..

(kriti sanon birthday : how did kritis become actress, modelling, south films to bollywood)

क्रिती सध्या बॉलीवुड मधील एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. पण क्रिती अभिनेत्री होण्याआधी एक इंजिनियर होती. विश्वास बसणार नाही हे खरे आहे. क्रितीचे घरचे वातावरण पूर्णतः वेगळे आहे. तिचे वडील राहुल सनन सिए आहेत तर आई गीत सनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहे. त्यामुळे क्रितीची देखील शैक्षणिक वाटचाल चांगली राहिली. तिने नोएडा येथील कॉलेजमधून बीटेकची पदवी पूर्ण केली आहे. असं म्हणतात क्रिती अभ्यासात देखील तिकीतच हुशार होती. (kriti sanon age) (kriti sanon movies)

पण अभिनयाची आवड असल्याने क्रिती या वाटेकडे वळली. तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिने मोडलिंग करत आपल्या टॅलेंटची जादू दाखवायला सुरुवात केली. यावेळी तिला काही कटू अनुभवही आले, तिच्याकडून काही चुका झाल्या पण क्रितीने हार मानली नाही. याउलट अधिक झपाट्याने काम केले. पुढे ते दाक्षिणात्य चित्रपटात आपले नशीब आजमावले. तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर 'नेनोक्कडाइन' हा क्रितीचा पहिला चित्रपट होता. 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेचे कौतुकही झाले. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू प्रमुख भूमिकेत होता.

यानंतर क्रितीने बॉलिवूडमध्ये आली. 'हिरोपंती' हा तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट. हा चित्रपट देखील 2014मध्येच रिलीज झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिने 'दिलवाले', 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी', 'पानिपत', 'हाऊसफुल', 'मिमी' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि ते सिनेमे हीट देखील झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT