Kriti Sanon Book Show For Adipurush: सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूडअभिनेत्री क्रिती सेननचा बहूप्रतिक्षित चित्रपट 'आदिपुरुष' रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला अडकला होता.
चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर लोकांनी या चित्रपटावर अनेक प्रश्न उपस्थीत केली होती. त्यामुळे 'आदिपुरुष'मध्ये अनेक सुधारणा निर्मात्यांना केल्यात आणि चित्रपट उशीर रिलिज करण्यात आला.
मात्र चित्रपट रिलिज झाल्यानंतर तर हा वाद आणखीच वाढला प्रेक्षकांना हा सिनेमामुळीच पटलेला नाही. त्यातील कलाकारांचे लुक्स त्याचे संवाद त्याचबरोबर VFX हे त्यांना काही पटलेलं नाही.
बॉलीवूड स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या चित्रपटाचा विरोध केला. सोशल मिडियावर तर ज्यानीही हा सिनेमा पाहिला त्यांनी याता रिव्ह्यू शेयर करत हा सिनेमा का पाहू नये याचा पाढाच वाचला.
मात्र या सगळ्या वादादरम्यान आदिपुरुषमध्ये मुख्य भुमिकेत असलेले प्रभास आणि सैफ अली खान हे मौन असले तरी जानकीची भुमिका साकारणारी क्रिती सेनन मात्र या सर्व परिस्थीतीला सकारात्मक पद्धतिने हाताळतांना दिसत आहे.
ती या चित्रपटाला सोशल मीडियावर मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाकडे लक्ष देण्याविषयी बोलली त्यानंतर आता तिने आरकेपुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना 'आदिपुरुष' दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिती याच शाळेत शिकली आहे.
इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार, कृती सेनन 21 जूनला दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना 'आदिपुरुष' दाखवणार आहे. यादरम्यान तिचे कुटुंबही क्रितीसोबत असणार आहे. तिने यासाठी दिल्लीतील एका मल्टिप्लेक्समध्ये शो बुक केला आहे. मात्र अद्याप क्रितीने स्वत: या बातमीची काही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आदिपुरुषनंतर आता ती 'द क्रू'मध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट यावर्षी 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान आणि तब्बू देखील दिसणार आहेत. याशिवाय प्रेक्षक तिच्या 'गणपत' या चित्रपटाचीही वाट पाहत आहेत ज्यात ती टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याचबरोबर ती शाहिद कपुर सोबतही काम करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.