KRK Comment On Karan Johar And Liger : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा लाईगर हा चित्रपट रिलीज होताच फ्लॉप झाला आहे. या चित्रपटाला सोशल मीडिया युजर्सबरोबर समीक्षकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असणाऱ्या केआरकेनेही (KRK) या चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. केआरकेने करण जोहरकडे लाईगर पाहण्यासाठी खर्च केलेले एक हजार रुपये परत मागितले आहेत.
काय आहे केआरकेचे ट्विट
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या 'लाइगर' या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. अशा स्थितीत केआरकेनेही चित्रपटासाठी ट्विट करत करण जोहरला टॅग करत तिकिटाचे पैसे परत मागितले.
केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, भाऊ करण जोहर (Karan Johar), मी तुझा लाईगर चित्रपट (Liger Film) पाहण्यासाठी एक हजार रुपये खर्च केले आणि त्या बदल्यात माझा छळ झाला. तर भाऊ तुम्ही मला माझे पैसे परत देऊ शकता का? माझे पैसे पाठवा किंवा खात्यात जमा करा. धन्यवाद !
चित्रपट लाईगर कसा आहे?
लाईगर चित्रपटाचा ट्रेलर आणि त्याचे जोरदार प्रमोशन पाहिल्यानंतर, हा चित्रपट चांगला कलेक्शन करू शकेल अशी आशा होती. परंतु चित्रपट अपेक्षेनुसार कामगिरी करु शकला नाही. चित्रपट केवळ पटकथेतच नाही तर तांत्रिकदृष्ट्याही खूपच कमकुवत ठरतो.
या चित्रपटातील अनन्या पांडेचा अभिनयही खूपच निराशाजनक असून, तिला पुन्हा एकदा पाहून तिने अभिनयाचे क्लासेस घ्यावेत, असे वाटते. रोनित रॉयचे काम दमदार दिसत असले तरी विजयने चित्रपटात उत्तम काम केले आहे. (Bollywood News)
लाईगरचा दक्षिणेतील कमाई
लाईगरला एक दिवसापूर्वी दक्षिण भारतात रिलीज करण्यात आले होते. लाईगरने आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि अमेरिकेत २४५ कोटींचा गल्ला जमा केला आहे. गुरुवारी रात्री ९ नंतर हिंदी व्हर्जन प्रदर्शित झाला, तीही एका शोसह त्यामुळे हिंदीबाबतचा अद्याप कोणताही ठोस अहवाल नाही. चित्रपटावर रिलीजपूर्वी बहिष्कार टाकण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.