sushant singh rajput  Team esakal
मनोरंजन

'मला दुसरा सुशांतसिंग राजपूत व्हायचं नाही'

त्यानं काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या राधे चित्रपटाचा (radhe movie review) रिव्ह्यु केला होता.

युगंधर ताजणे

मुंबई - कमाल राशिद खान (kamal rashid khan) सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चेत असणारा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यानं वेगवेगळ्या सेलिब्रेटीशी (bollywood celebrity) पंगा घेतला आहे. त्याचे आणि सलमानचे व्टिटर वॉर सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर गायक मिका सिंगशीही त्याचे वाजले आहे. मिकानं त्याच्यावर एका गाण्याची निर्मिती करुन सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर कमालनं त्याला ते गाणं प्रसिध्द तर करुन दाखव. अशा शब्दांत धमकी दिली होती. आता कमालनं आपल्याला बॉलीवूडमधील दुसरा सुशांतसिंग राजपूत व्हायचं नाहीये. अशी एक पोस्ट व्हायरल केली आहे. ( krk calls out bollywood ke gunde says main dusra sushant singh rajput nahi banoonga)

बॉलीवूडमध्ये जे वादग्रस्त प्रतिक्रिया देणारे सेलिब्रेटी आहेत त्यात केआकेचाही क्रमांक लागतो. त्यानं काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या राधे चित्रपटाचा (radhe movie review) रिव्ह्यु केला होता. त्यामुळे तो चर्चेत आला होता. त्यावरुन त्याला मोठ्या वादालाही सामोरं जावं लागलं होतं. सलमाननं त्याच्यावर बदनामी केल्याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. य दरम्यानं बॉलीवूडमध्ये जी दादागिरी चालते त्यावर केआकेनं एक व्टिट केलं होत. त्यात अभिनेता जॉन अब्राहम, विवेक ऑबेरॉय आणि अरिजीत सिंगचे नाव घेतले होते.

krk tweet

केआरकेनं आता जे व्टिट केलं आहे त्यात त्यानं आपण बॉलीवूडच्या कोणत्याही गुंडाला घाबरत नसल्याचे सांगितले आहे. आणि मला दुसरा सुशांत सिंग (sushant singh rajput) व्हायचे नाही. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात त्याला चाहत्यांनीही प्रतिसाद दिलाय. तर दुसरीकडे काहींनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. केआरकेचा रोख नेमका कुणाकडे आहे, असे प्रश्न त्याला विचारले आहेत.

krk tweet

अनेक नेटक-यांचे असे म्हणणे आहे की, त्यानं ते व्टिट सलमानला उद्देशून केलं आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं काही दिवसांपूर्वी सलमानशी थेट पंगा घेतला होता. सलमानला भ्रष्ट म्हणण्यापर्यत केआरकेची मजल गेली होती. त्यामुळे सलमानच्या लीगल टीमनं त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. केआरकेनं कुणाचं नाव न घेता असे लिहिलं आहे की, भलेही तु बॉलीवूडचा गुंड असशील आणि मी बाहेरचा असेल, मात्र मला दुसरा सुशांतसिंग राजपूत व्हायचे नाही.

अपमानातून मी माझे बरेवाईट तर करणार नाही. आणि अशाप्रकारे बॉलीवूडचा विजय होणार नाही. हे त्यांनीही लक्षात घ्यावे. याचे एक कारण म्हणजे त्यांनी यावेळी एका चूकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला आहे. त्याचे हे व्टीट सध्या चर्चेत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT