KRK Tweet Esakal
मनोरंजन

KRK Tweet: 'अक्षयनं माझं ऐकलं..तो कपिल आहेच पनौती', केआरकेनं पुन्हा अक्कल पाजळली

सकाळ डिजिटल टीम

कमाल आर खान उर्फ ​​केआरके हे ट्विटरवर त्याच्या वेगवेगळ्या ट्विटनं नेटकऱ्यांच मनोरंजन करत असतो असं म्हटल्याचं वावगं ठरणार नाही. तो असं काहीतरी ट्विट करतो की त्यामुळे लोकांना हसू येत तर काही त्याला ट्रोल करतात. पण केआरकेवर याचा काही परिणाम होत नाही.

त्याने त्याच्या एका ट्विटमध्ये, 'द कपिल शर्मा शो'ला 'मोठी पणौती' असल्याचं म्हटलं होत. पठाणला ब्लॉकबस्टर प्रतिसाद मिळाल्यानंतर, केआरकेनं कपिलच्या शोला पणौती म्हटलं होतं. फक्त पठाण नव्हे तर काश्मीर फाइल्सचंही त्याने उदाहरणही दिले. द कपिल शर्मा शोमध्ये दोन्ही चित्रपटांचे प्रमोशन केले गेले नाही पण त्यामुळे ते सुपरहिट झाले असं तो म्हणत आता त्याने अक्षयचं कौतुक केलं आहे.

खिलाडी अक्षय कुमारचा 'सेल्फी' चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. मात्र यावेळी अक्षय त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा'मध्ये गेला नाही. यावर अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमल आर खान यांनी कपिल शर्मा शोवर टोमणा मारताना त्याला पणौती म्हटले आहे. अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये न जाऊन चागलं काम केल्याचे केआरकेचे म्हणणे आहे.

केआरके ट्विटर खूप सक्रिय आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटाचा संदर्भ देत त्यानं ट्विट केलं. यात तो लिहितो की, "अखेर अक्षय कुमारने 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'सेल्फी'चे प्रमोशन न करून चांगले काम केले आहे. द कपिल शर्मा शो हा चित्रपटांसाठी मोठी पणौती असल्याचे अक्कीला समजले.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा 'सेल्फी' पुढील महिन्यात 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्की आणि इम्रान व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT