Krushna Abhishek Govinda bollywood Actor : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा - भाच्याचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. सोशल मीडियावर तर कृष्णावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासगळ्यात कृष्णाची मामी सुनिता आणि गोविंदानं देखील एका मुलाखतीतून कृष्णाच्या सततच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कृष्णा आणि आरती यांच्याविषयी जेव्हा सुनीता यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, मला त्यांच्याविषयी खरचं काही विचारु नका. त्यांनी त्यांच्या शोमध्ये जे काही केलं ते सगळ्यांना माहिती आहे. मला आता त्यांचा राग येतो आहे. गोविंदा देखील त्यांना काही बोलत नाही. मला पश्चाताप होतो आहे माझ्या वागण्याचा. आपल्या चांगुलपणाचा कुणी किती गैरफायदा घेऊ शकतं हे यानिमित्तानं दिसून आले आहे.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
गोविंदाचे म्हणणे आहे की, प्रत्येकाचा वेगळा स्वभाव आहे. त्यावेळी माझी सगळ्या बाबत निर्णय घेत असे. आता मला माहिती नाही की, काय झाले आहे. आणि आता परिस्थिती नेमकी काय आहे. तेव्हा तर मी खूप लहान होतो. मोठ्या माणसांमध्ये काय घडले याविषयी सांगता येणार नाही. आता समोर वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहे. जेव्हा तुम्ही लोकांचे प्रमाणापेक्षा जास्त लक्ष खेचून घेता तेव्हा तुम्हाला त्यांचे श्रेय घ्यावेसे वाटते.
गोविंदानं पुढे सांगितलं की, त्यांचे वडील खूप चांगले व्यक्ती होते. देवासमान होते. त्यांची आई ही माझी सगळ्यात प्रेमळ बहिण होती. त्यामुळे कृष्णासोबत जे काही होत होते त्याला आम्ही फारसं कधी गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र आता त्याची वागणूक बदलली आहे. आता मी जे तुम्हाला काय सांगतो आहे ते तुम्हाला कदाचित पटणार नाही. मात्र एक ना एक दिवस खरं बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मी कृष्णाला का बोलत होतो हे कळलेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.