Kushal Badrike  Esakal
मनोरंजन

Kushal Badrike:'मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा पण त्याआधी..', कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

कुशल बद्रिके अलिकडे सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतो.

प्रणाली मोरे

Kushal Badrike: कुशल बद्रिके सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत चर्चेत येत असतो. त्याचे व्हिडीओ आणि रिल्स तर चाहते भरपूर एन्जॉय करतात. 'चला हवा येऊ द्या' या झी मराठी वरील रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धिच्या झोतात आलेला कुशल आता सिनेमातील त्याच्या भूमिकांमुळेही लोकांचा फेव्हरेट बनत चालला आहे.

'एक होता काऊ', 'पांडू' हे त्याचे सिनेमे लोकांना अधिक आवडले. आता कुशल बद्रिकेचा 'रावरंभा' सिनेमा आपल्या भेटीस आला आहे. या सिनेमात पहिल्यांदाच कुशलनं कुरबत खान हे खलनायकी पात्र रंगवलं आहे.

या सिनेमाच्या निमित्तानं खरंतर कुशलनं पोस्ट केली आहे पण तो असं का म्हणतोय की 'मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा ..', चला जाणून घेऊया या पोस्टविषयी.

कुशल बद्रिकेनं लिहिलं आहे की,''मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा. मुलांना स्पार्टन-300 ची गोष्ट कळायला हवी, पण पावनखिंडीवर बाजीप्रभू देशपांडेंसह प्राणांची आहुती देणारे “300 मावळे” आधी कळायला हवेत.
लढाई जिंकून देणारा महाबली हल्क मुलांना माहित हवा, पण शौर्य आणि इमान यांच दुसरं नाव असलेले सरसेनापती “हंबीरराव मोहिते” आधी कळायला हवेत''.

''आयर्न मॅन ची गोष्ट मुलांना आपण सांगायलाच हवी, पण लोखंडाच्या सळ्यांनी डोळ्यांच्या खाचा झाल्या तरीही एकही हुंदका न देणारे आपले “छत्रपती संभाजी राजे” आधी कळायला हवेत.
कॅप्टन अमेरिकेच्या नेतृत्वाला लाजवील असं आपल्या “छत्रपती शिवाजी महाराजांचं” नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर रक्तात भिनायला हवं''.
''आपले सुपरहिरोज मुलांना आधी कळायला हवेत.
यावेळी आम्ही घेऊन आलोय आपल्या अशाच “7सुपरहिरो” ची कहाणी…. वेडात दौडलेल्या त्या “सात वीरांची” गोष्ट
सरसेनापती “प्रतापराव गुजर” आणि सोबतीच्या “सहा मावळ्यांची” गोष्ट
मुलांना ही गोष्ट बघायला नक्की घेऊन या''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT