Kushal badrike shared post for amruta khanvilkar chandra dance is not easy sakal
मनोरंजन

Kushal badrike: 'चंद्रा'वर नाचता नाचता कुशल बद्रिके स्टेज वरून खाली.. पोस्ट करत म्हणाला..

अमृता खानविलकर समोरच कुशलने केला 'चंद्रा' डान्स, पण पडला महागात..

नीलेश अडसूळ

Kushal Badrike: गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या'. या मंचावरून होणाऱ्या विनोदाच्या आतिषबाजीने प्रेक्षकांना प्रेक्षकांना भरभरून हसवले. हा कार्यक्रम घराघरातील अविभाज्य घटक बनला आहे.

या मंचावर एकशे एक विनोदवीर आहेत. ते कलाकार आणि त्यांनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. म्हणून गेली अनेक वर्ष या कार्यक्रमाची जादू आहे. या कार्यक्रमासाठी कलाकार खूप मेहनत घेतात. बऱ्याचदा त्यांची दमछाक होते. अशीच दमछाक अभिनेता कुशल बद्रिकेची झाली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने शेयर केला आहे.

(Kushal badrike shared post for amruta khanvilkar chandra dance is not easy chala hawa yeu dya)

कुशल बद्रिके सोशल मीडियावर सध्या भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो सतत काहीना काहीतरी पोस्ट करत असतो. आज त्याने एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ चला हवा येऊ द्या.. च्या मंचवरील आहे. या भागात कुशलने चक्क 'चंद्रा' या गाण्यावर नाचला आहे. विशेष म्हणजे अमृता खानविलकर समोर त्याने हा डान्स केला आहे. पण तो करताना इतके सायास झाले की त्यावर कुशलने एक पोस्ट लिहिली आहे.

या पोस्ट मध्ये कुशल म्हणतो, 'अमृता खानविलकर ने केलेला चंद्रा चा डान्स वाटतो तितका सोपा नाही बरं, आमच्या स्नेहल शिदमचा जवळ जवळ “जीव गेला “, मला शिकवता शिकवता. शेवटी माझा नृत्याविष्कार बघून अमृताचाही जीव जाता जाता राहिला . एकदा अजय-अतुल यांना प्रत्यक्ष करुन दाखवेनच म्हणतोय माझा डान्स '

या व्हिडिओमध्ये कुशल 'चंद्रा' गाण्यावर थीरकला आहे. विशेष म्हणजे तो नाचताना या गाण्याची मूळ डान्सर अमृता खानविलकर समोर होती. त्यामुळे हा डान्स करताना कुशल पुढे मोठं आव्हान होतं. नाचताना एका स्टेपला तर कुशल स्टेज वरुन खाली पडला. त्याची ही अदा पाहून सगळेच अवाक झाले. पण हा डान्स करणं कीती अवघड आहे हे मात्र त्याने जाहीरपणे मान्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT