Aamir Khan and Nagaraj Manjule  esakal
मनोरंजन

Aamir Khan: 'शिवाजी महाराजांवर चित्रपट निर्मिती करणार!'

युगंधर ताजणे

Aamir Khan: फँड्री, सैराट यासारख्या चित्रपटांतून आपलं वेगळेपण मराठी प्रेक्षकांच्या मनावर ठसवणारा दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे ओळखला जातो. (Marathi Director Nagaraj Manjule) त्याच्या झुंड या पहिल्या हिंदी चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये त्यानं बिग बी अमिताभ बच्चन यांना घेऊन काम केले होते. त्यामुळे या चित्रपटाची उंची आणखी वाढली होती. नागराजचा झुंड प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान, टॉलीवूडचा सुपरस्टार धनुषच्या कमेंट्स व्हायरल झाल्या होत्या.

आमीरनं जेव्हा नागराजचा झुंड पाहिला तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. आपल्या सारख्यांचा नागराजनं फुटबॉल करुन टाकला. अशा शब्दांत आमीरनं नागराजला (Bollywood Movies) शाबासकी दिली होती. आता आमिर खानने दिग्दर्शक नागराजसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं झालं असं की, सुपरस्टार आमिर खान आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांशी अतिशय वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. लाल सिंग चड्ढाच्या या पर्फेक्शनीस्ट अभिनेत्याने प्रतिभावान नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा या भेटीत व्यक्त केली.

सैराट, फॅन्ड्री, बाजी, अँन एसे ऑफ द रेन, झुंड अशा अनेक चित्रपटांचा प्रतिभावान दिग्दर्शक नागराज आणि आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा पर्फेक्शनीस्ट अभिनेता आमिर यांची कलाकृती पाहण्यास आता चाहते उत्सुक असतील. या वेळी गप्पांमध्ये नागराज मंजुळे यांनी आमिर खानला रुपेरी पडद्यावर कोणती भूमिका साकारायची आहे याबद्दल विचारले. ज्यावर आमिरनं सांगितले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट करायचा आहे, कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाने तो खूप मोहित आणि प्रेरित आहे.

आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे उधाण आणले आहे. चाहते चित्रपटातील प्रत्येक भागाचे भरभरुन कौतुक करत आहेत. अलीकडेच, यातील एक गाणे 'कहानी'चा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आणि सर्वच स्तरातील प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित, 'लाल सिंग चड्ढा' मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT