Lapataganj actor Arvind Kumar passes away due to cardiac arrest  SAKAL
मनोरंजन

Lapataganj Arvind Kumar: 'लापतागंज'मधील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; शुटसाठी जात असतानाच...

Devendra Jadhav

Lapataganj Arvind Kumar Death News: सब टीव्हीच्या लोकप्रिय शो 'लापतागंज'मध्ये चौरसियाची भूमिका साकारणारे अरविंद कुमार यांचं निधन झालंय. 10 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचे निधन झाले.

मिडीया वृत्तानुसार, अरविंद शूटसाठी जात असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापुर्वीच त्यांचं निधन झालंय

(Lapataganj actor Arvind Kumar passes away due to cardiac arrest )

ही दु:खद बातमी अभिनेता विनोद गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि जवळच्यांना मोठा धक्का बसला.

अरविंद कुमार लापतागंज मालिकेतील चौरसिया यांचे लोकप्रिय संवाद आणि भुमिकेसाठी लोकप्रिय होते.

अरविंद कुमार यांनी 2004 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी SAB टीव्हीच्या लापतागंज मालिकेत 5 वर्षे चौरसियाची भूमिका केली. याशिवाय त्यांनी क्राइम पेट्रोल आणि सावध इंडिया सारख्या शोमध्येही अभिनय केला.

अरविंद यांनी चीनी कम, अंडरट्रायल, रामा राम क्या है ड्रामा आणि मॅडम मुख्यमंत्री अशा चित्रपटांमध्येही काम केलंय. मालिका आणि सिनेमा विश्वातील अनेक कलाकार अरविंद यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : अमेरिकेत फेलोशिपसाठी आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची नियुक्ती; भारतातून निवड झालेल्या ठरल्या एकमेव अधिकारी

SCROLL FOR NEXT