लता मंगेशकर या भारतीय मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध गायिका. लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झालं. लता मंगेशकरांच्या निधनाने संगीतप्रेमींना धक्का बसला. आजही लता मंगेशकर यांची गाणी आवडीने ऐकली जातात.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने याविषयी खुलासा केलाय.
(lata mangeshkar family donate 10 lakh rupees to mandir)
वृत्तानुसार, दिवंगत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छापत्राच्या आधारे तिरुमला मंदिराला 10 लाख रुपये देणगी देऊन त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या बोर्ड सदस्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात, लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांनी अधिकृतपणे मंगेशकर कुटुंबाच्या वतीने देणगीची विनंती केली.
लता मंगेशकर या भगवान व्यंकटेश्वराचे निस्सीम भक्त होत्या. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत तिरुपती ट्रस्टचे दरबारी संगीतकार म्हणूनही काम केले होते.
अहवालांनुसार, गेल्या वर्षी जुलै 2022 मध्ये, लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने स्वर माऊली फाउंडेशनची स्थापना करून दिवंगत लता मंगेशकर यांचं स्वप्न पूर्ण केलं.
या फाऊंडेशनच्या माध्यमातून एनजीओ आणि वृद्धाश्रमांसाठी साहाय्य करण्यात येते. फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजूंसाठी निवास व्यवस्था, गायन, नृत्य आणि अभिनय यासारख्या परफॉर्मिंग कलांमध्ये इच्छुक तरुण प्रतिभांना मदत करते.
लता मंगेशकर कुटुंबीयांच्या मते, फाऊंडेशनला भारतातील स्वर कोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवडचा प्रोजेक्ट म्हणून संबोधले जाते.
वृद्धाश्रमाच्या बांधकामाचे उद्घाटन करणे हा फाउंडेशनचा प्राथमिक उद्देश आहे. मुख्यतः त्या कलाकारांसाठी ज्यांना त्यांच्या जीवनसंघर्षामुळे त्यांची स्वप्ने सोडावी लागली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.