भारतरत्न स्वर कोकिला आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा रॉलिंग स्टोन मॅग्जीन च्या 200 सर्वोत्कृष्ट गायकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांना यादीत ८४व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.
त्याचवेळी या यादीत दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचाही समावेश आहे. याशिवाय दक्षिण कोरियाचे गायक ली जी-उन यांचाही समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर BTS चा सर्वात तरुण गायक जुंगकुकचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र गायिका सेलीन डिऑनला या यादीतून वगळण्यात आले असले तरी, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
हे ही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
रोलिंग स्टोनच्या 200 महान गायकांच्या यादीत लता मंगेशकर
रोलिंग स्टोननं गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल लिहिले, "'द क्वीन ऑफ मेलडी'चा मधुर आवाज ज्याने भारतीय पॉप संगीताचा पाया घातला. ज्यानी बॉलीवूड चित्रपटांमधून संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्यांनी आपल्या आवाजाने सुवर्णकाळाची व्याख्या केली. त्या महान पार्श्वगायक म्हणजे लता मंगेशकर जी. ज्यांनी आपल्या गायनाने अनेक अभिनेत्यांनासाठी उत्तम गाणी गायली. ज्यानी 7,000 हून अधिक गाण्यांचे रेकॉर्ड केले.
आपल्या सुरेल आवाजाने जगभरात ओळखल्या गेलेल्या लता मंगेशकर यांचे फेब्रुवारी २०२२ मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ताल मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.