मुंबई: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mangeshkar) यांचे काल सकाळी सव्वा आठच्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडवर शोककळा पसरल्याचे दिसून आले. तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील लतादीदींच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काल लतादीदींच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, या अंत्यसंस्काराला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार का उपस्थित नव्हते? असा सवाल समाजमाध्यमांवर चर्चिला जात होता. त्यावर आता अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने उत्तर दिलं आहे.
काल शिवाजी पार्कवर मराठी कलाकार दिसत नव्हते. बरेचशे हिंदी कलाकारही उपस्थित नव्हते. तर शिवाजी पार्कवर आज कलाकारांना प्रवेश बंदी होती का? अशी पोस्ट एका युझरने टाकली होती. त्यावर तिने उत्तर दिलं आहे.
तिने म्हटलंय की, सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप मी आणि अभिजीत केळकर 4 वाजल्यापासून तिथं होतो. शेवट पर्यंत आम्हांला विनंती करून ही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रीटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो.
पुढे तिने म्हटलंय की, आम्हांला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं.
स्वरसम्राज्ञी हरपली
गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ लता दीदी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डॉक्टर सर्वोतोपरी उपचार करत होते. मात्र मल्टिपल ऑर्गन फेल्युयर झाल्यानं त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे सांगण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.