Lata Mangeshkar esakal
मनोरंजन

Lata Mangeshkar: संस्कृती, भाषा, संगीत, माणुसकीचा वटवृक्ष

दोन-तीन तास झाले त्यावेळेत कुणीतरी येऊन डोकावून जायचे. लतादीदी डोकावून जायच्या.

सकाळ वृत्तसेवा

१९७० चे दशक. लता मंगेशकर यांच्या घरी पहिल्यांदा मी गेलो. पंडित हृदयनाथ यांनी मला बोलाविले होते. सोबत रामदास भटकळ आणि चंद्रकांत पाटील होते. ‘प्रभुकुंज’ला दुपारी साडेबाराला गेलो. ही पहिली भेट होती. आम्ही तिघे हृदयनाथांच्या एका खोलीत हार्मोनिअम घेऊन बसलो. दोन-तीन तास झाले त्यावेळेत कुणीतरी येऊन डोकावून जायचे. लतादीदी डोकावून जायच्या. हे कोण असतील, हृदयनाथ एवढे त्यांना घेऊन का बसले, असेही त्यांना वाटले. हृदयनाथांनी माझी रानकवी वगैरे म्हणून ओळख करून दिली. सायंकाळी साडेसहाला आम्ही ‘प्रभुकुंज’वरून परतलो. (Lata Mangeshkar Momeries)

- ना. धों. महानोर

कौतुकाची पहिली थाप

लता मंगेशकर यांचे १९७७ मध्ये मला पत्र आले. आदिवासी जीवनावर संगीतप्रधान चित्रपट करायचा आहे. जब्बार पटेल, स्मिता पाटील हे सगळे असतील. यात तुम्हीही गीतकार व कवी असणार असे सांगण्यात आले. हे वाचून मी हादरलो. मी माझ्या खेड्यात शेती करतो. रानातील कवितांमध्ये त्यांना असे काय दिसले असेल, असाही प्रश्‍न पडला. एक-दोन नव्हे सोळा गाणी लिहायची होती. मी सहा महिने टाळले; पण अखेर ते मला मुंबईला घेऊन गेले. १९७७ मधील गुढीपाडव्याच्या दिवशी मी ‘प्रभुकुंज’मध्ये होतो. त्यावेळी लतादीदींसह सर्वांनी कोणताही दबाव माझ्यावर टाकला नाही, उलट आत्मविश्‍वास दिला. मर्जीनुसार काम करायला मोकळीक दिली. मग ‘मी रात टाकली मी कात टाकली.’ हे गीत लिहिताच ते सर्व उडालेच. पाठीवर कौतुकाची पहिली थाप पडली. त्यानंतर तीन दिवस-रात्र जागून आठ-दहा गाणी लिहिली. हा गुढीपाडवा मला वैभव देऊन गेला.

ही सुरुवात होती. आजही ती गाणी तशीच गाजतात, लोकांच्या मनात ती ठसलेलीच; पण लतादीदींचा स्वर व हृदयनाथांचे संगीताचे आत्मप्रेम, ओलावा मला मिळाला. माझ्यासारखाच असंख्य लोकांचे लतादीदी व मंगेशकर परिवाराने सोने केले. रमेश देव यांच्या ‘सर्जा’ चित्रपटासाठी ‘चिंब पावसाने रान झालं’ या गीताचे लेखन केले. तेव्हा त्यांनी मला ‘आजोळची गाणी’ स्वतंत्र हवी व ती मीच गाणार असे लतादीदी म्हणाल्या. त्यांनी स्वतःहून माझ्याकडे गीते मागणे ही मोठीच गोष्ट. काम झाले की संपले असे वातावरण असतानाही आमचा कौटुंबिक स्नेह होता.

दुःखितांचा कळवळा

दुःखितांचे जीवन सुखी करण्यासाठीची भावना दीदींच्या मनात येणे हे अद्भुतच. पुणे येथे त्यांच्या प्रयत्नातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची उभारणी झाली, हेही त्याचेच द्योतक. ‘हायफाय’ व सुखवस्तू जगणारे हे लोक, अशी जगतात लतादीदींची प्रतिमा झाली; मात्र प्रत्यक्षात दुःखितांचा कळवळा त्यांना होता. दुःखितांचे जगणे सुकर करणे त्यांना महत्त्वाचे वाटे. माझ्या दुःखाच्या काळात विचारणा, आस्थेवाईकपणे फोन, पत्रव्यवहारातून चौकशी, मला उभे करणे या गोष्टी क्वचितच काही माणसांत असतात. त्या लतादीदींत होत्या. माझी पत्नी गेली तेव्हा त्यांना खूप हळवेपण आले होते. एकाच काट्याकुट्याच्या रस्त्याचे आम्ही वाटसरू. त्यामुळे आमचे ऋणानुबंध आणखी घट्ट झाले. साधना घेऊन आयुष्यभर महाराष्ट्राला वैभव लतादीदींनी दिले. विविध भाषा, राज्य, भारतीय संस्कृतीत त्या वटवृक्षांसारख्या घट्ट उभ्या राहिल्या. स्वतःचे सौभाग्य टाळून वेगळे सौभाग्य निर्माण करणे, गाण्याला, चित्रपटाला ऐवज निर्माण करून देणे, गीत, संगीत व माणूसपण हा लतादीदींचा वटवृक्ष. तो कधीही नष्ट होणार नाही.

जादुई आवाजाचे जगभरात चाहते

संपूर्ण मंगेश कुटुंबाचे कला क्षेत्राशी नाते आहे. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची स्वतःची नाट्य कंपनी होती. त्यांच्या दोन बहिणी आशा भोसले व उषा मंगेशकर या पार्श्‍वगायिका आहेत. तिसरी बहीण मीना खडीकर या लेखिका आहेत तर भाऊ हृदयनाथ मंगेशकर संगीतकार व गायक आहेत.

लता मंगेशकर या १९९९ ते २००५ पर्यंत राज्यसभेच्या सदस्या होत्या. पण खासदारकीच्या कार्यकाळाबद्दल त्या नाखूष होत्या. राज्यसभेसाठी त्या फारशा इच्छुक नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

संगीतकार नौशाद यांच्याबरोबर गाणे ध्वनिमुद्रित करीत असताना स्टुडिओतील उष्मा सहन न झाल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत दिली होती.

स्वतःची गाणी कधी ऐकत नसल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. जर गाणी ऐकली तर त्यात १०० चुका लक्षात येतील, असे कारण लतादीदींनी सांगितले होते.

मदन मोहन हे सर्वांत लोकप्रिय संगीत दिग्दर्शक असल्याचे लता मंगेशकर सांगत. ‘जहाँआरा’ चित्रपटातील ‘वह चुप रहे’ हे त्यांचे आवडते गाणे होते.

त्या भारतातील एकमेव गायिका होत्या, ज्यांनी प्रथम लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गायन केले होते.

लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने प्रभावित होऊन फ्रान्स सरकारने २००७मध्ये त्यांना ‘लिजंड ऑफ ऑनर’ हा सन्मान दिला होता.

सर्वाधिक गाणे गाणाऱ्या पार्श्‍वगायिका असलेल्या लता मंगेशकर यांचे नाव १९७४ मध्ये गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले होते. मोहमंद रफी यांनी त्याला विरोध केला होता.

१९९१ पासून २०११ पर्यंत या काळात आशा भोसले यांचे नाव ‘गिनिज बुक’ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT