Laxmikant Berde death anniversary anand shinde and laxmikant friendship and favourite song sakal
मनोरंजन

Laxmikant Berde: आनंद शिंदेंच्या 'या' गाण्याचे दिवाने होते लक्ष्मीकांत बेर्डे.. म्हणूनच..

लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज पुण्य तिथी, त्या निमित्ताने जाणून घेऊया हा खास किस्सा..

नीलेश अडसूळ

Laxmikant Berde death anniversary : मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारा एक नट म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. मनोरंजन विश्वातल्या एका अढळताऱ्याने लवकर एक्झिट घेतली. पण त्यांच्या स्मृति आजही आपल्या मनात आहेत. आजही त्यांचे चित्रपट, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. आज 16 डिसेंबर रोजी त्यांचा स्मृतीदिन. आज ते आपल्यात नसले तरी त्यांची कला. त्यांचे चित्रपट, आठवणी सगळं काही आपल्यासोबत आहे आणि कायम राहणार आहे. यातलीच एक आठवण म्हणजे त्यांची आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची मैत्री.. आनंद शिंदेंचे एक गाणे ऐकून लक्ष्मीकांत दिवाने झाले होते. पुढे त्यांनी त्यांनी एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे आनंद शिंदे यांची साथ दिली.. त्याच या काही आठवणी..

(Laxmikant Berde death anniversary anand shinde and laxmikant friendship and favourite song)

आनंद शिंदे ही लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठ्या भावाच्या स्थानी मानायचे. लक्ष्मीकांत कलाकार म्हणून जेवढे मोठे होते त्याहून कैकपट ते माणूस म्हणून ग्रेट होते, असे आनंद शिंदे कायम सांगतात. पण त्यांची ही मैत्री एका गाण्यामुळे झाली.. आणि ते गाणं होतं.. 'जवा नवीन पोपट हा.. लागला मिठु मिठु बोलायला..' झालं असं की..

आनंद शिंदे यांचं ‘नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला...’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्या काळात सर्वाधिक कॅसेट्स एका दिवसात विकल्या गेल्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली. गाण्याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेने प्रभावित होऊन निर्माते चंपक जैन यांनी जुहूच्या ‘सी प्रिंसेस’ हॉटेलमध्ये सक्सेस पार्टी आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते आनंद शिंदे यांचा सत्कार करण्याचे ठरले होते.

या आठवणी विषयी आनंद शिंदे एका मुलाखतीत म्हणाले होते, 'मी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खूप मोठा फॅन होतो. त्यांच्याच हस्ते मला डबल प्लॅटिनम डिस्क देऊन गौरवण्यात येणार आहे, हे जेव्हा मला कळलं, तेव्हा माझा आनंद मी तेव्हाही शब्दात मांडू शकलो नाही. माझी आणि लक्ष्मीकांत बेर्डेंची ती पहिली भेट. त्या सोहळ्यात आमच्यात खूप गप्पा झाल्या. त्यांनी मला शाबासकीची थाप दिली आणि म्हणाले, ‘‘या एकाच गाण्यात तुम्ही अख्ख्या जगाला नाचायला भाग पाडलंत आणि मीही तुमचा फॅन झालो आहे.’’

पुढे ते म्हणाले''माझ्या गाण्याचे शब्दन् शब्द त्यांना पाठ होते, हे ऐकून मला फारच आनंद झाला. ज्या कलाकाराचे आपण फॅन आहोत, त्या कलाकाराने आपलं इतकं मनापासून कौतुक करणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लवकरच नव्या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे आणि त्यात त्यांना माझ्या आवाजात एक गाणं गाऊन हवं आहे. ते म्हणाले, ‘माझ्या कामातली एनर्जी आणि तुमच्या आवाजातील ताकद तोडीस तोड आहे. त्यामुळे एक धडाकेबाज गाणं या चित्रपटात झालंच पाहिजे. आणि ‘मज्जाच मज्जा’ चित्रपटात ‘पोपट बोलतोय मिठू मिठू’ ही गाणं त्यांनी माझ्याकडून गावून घेतलं.

पुढे ते म्हणले ''रेकॉर्डिंगनंतर काही दिवसांत त्यांचा मला फोन आला, की या गाण्यात पडद्यावर त्यांना असं दृष्य हवं आहे की माझाच कार्यक्रम सुरू आहे आणि माझ्याच तोंडी हे गाणं आहे. तसेच ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरही चित्रित होणार आहे. शूटिंगचा दिवस आला आणि मी सेटवर पोहचलो. काही वेळातच लोक लक्ष्मीकांत यांना विचारू लागले की ‘आनंद शिंदे’ हे भारतीय चित्रपट मंडळाचे सभासद नाहीत, तर त्यांना आपण कॅमेऱ्यासमोर कसं काय उभं करणार? ही बाब माझ्यापर्यंत न पोहचू देता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्याचक्षणी १५१ रुपयांची फी भरून मला भारतीय चित्रपट मंडळाचे लगोलग सभासद केले. त्यादिवशी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी माझ्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं. पुढे त्यांनी मला अनेक गाणी दिली आणि आमची मैत्री फुलत गेली,' अशी आठवण आनंद शिंदे यांनी सांगितली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT