Korean man grew up to be a Bihari esakal
मनोरंजन

Lee Yechan : 'कोरियन बिहारी' आला , जगभर व्हायरल झाला! सोशल मीडियावर घालतोय धिंगाणा

युगंधर ताजणे

Korean man grew up to be a Bihari : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. नेटकऱ्यांना एखादा व्हिडिओ किंवा फोटो आवडला तर ते शेयर करतात. त्यावर कमेंट्सही करतात. सध्या सोशल मीडियावर कोरियनमधल्या त्या युवकाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे जो जगभर प्रसिद्ध झाला आहे. त्यावरुन त्याला मिळालेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहे.

एखादा कोरियन माणूस बिहारी भाषेत जर तुमच्यासाशी बोलत असेल तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल. भारतातील व्यक्तींना आपल्याच दुसऱ्या एखाद्या भाषेत बोलायला लावले तर नीट बोलता येत नाही. याउलट परदेशातून आलेल्या त्या व्यक्तीनं सगळ्यांना जिंकून घेतले आहे. पर्पल रंगाच्या शर्टमधील कोरियन ली येचेनवर सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्यामुळे तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. अनेक माध्यमांनी त्याची दखल घेतली आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

ली नं हॅरी पॉटरनं जो चष्मा घातला होता अगदी तशाच प्रकारचा चष्मा डोळ्यावर चढवला आहे. त्याचा लूक हा नेटकऱ्यांच्या खास प्रतिक्रियांचा विषय आहे. त्यानं जे काही केलं आहे त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. लीनं यापूर्वी देखील वेगवेगळ्या व्हिडिओ, आणि पोस्टमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ली ने एकदम सफाईदारपणे बिहारी बोलून सर्वांना धक्का दिला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, सगळं काही खूप स्वच्छ आहे. आणि जो पूल तयार केला आहे तो खूपच भयंकर आहे.

ली च्या तोंडची ती बिहारी भाषा ऐकल्यानंतर अनेकांना नवल वाटले आहे. त्यानं तो व्हिडिओ इंस्टावर शेयरही केला होता. त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आहे. साऊथ कोरियाच्या त्या कलाकारानं त्याच्या कलाकृतीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ली हा ब्ल्यु क्रॉस कल्चरल स्टारचा कलाकार आहे. त्याची साऊथ कोरियामध्ये देखील मोठी क्रेझ आहे. त्याची लोकप्रियता मोठी आहे.

साऊथ कोरियाच्या ली ला बऱ्याच भाषा बोलता येतात. त्यामध्ये पाकिस्तानी, पंजाबी, बिहारी या भाषांचा समावेश आहे. तो वूनी यानावानं देखील लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये कोरियन बँड, कोरियन युट्युबर, कोरियन सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर यांचा खूप बोलबाला आहे. खासकरुन तरुणाईमध्ये त्यांच्या नावाची मोठी चर्चा असल्याचे दिसून आले आहे. युवतींमध्ये कोरियन बँडची असणारी क्रेझ तर खूपच जबरदस्त आहे.

तीन वर्षानंतर ली हा भारतात पुन्हा आला होता. त्याचा हैद्राबादमध्ये एक इव्हेंटही होता. मात्र तो जेव्हा हैद्राबादच्या विमानतळावर आला त्यावेळी त्याला तो शो कँसल झाल्याचे सांगण्यात आले. मग त्यानं पटणाला जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच्या मित्रानं त्याविषयी एक खास ब्लॉग देखील लिहिला होता. पटनामध्ये ली चे घर असून त्याचे आई वडिल देखील तिथेच राहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT