Dev Anand Bunglow: Legendary Actor Dev Anand’s Juhu Bungalow Sold For Rs 400 Crore, To Be Replaced With 22-Storey Tower Report  Esakal
मनोरंजन

Dev Anand Bunglow: 1950 साली बांधण्यात आलेल्या देव आनंद यांच्या बंगल्याची होणार विक्री! तब्बल इतक्या कोटींना झाली डिल!

Vaishali Patil

बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते असं व्यक्तिमत्व असलेले देव आनंद हे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. देव आनंद आता या जगात नसले तरी चाहते आजही त्यांची आठवण काढतात. त्याचे सिनेमे आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात. मात्र आता देव आनंद हे त्याच्या आलिशान बंगल्यामुळे कारणामुळे चर्चेत आले आहेत.

देव आनंद यांनी आपल्या आयुष्यातील 40 ज्या बंगल्यात घालवली तो बंगला आता विकण्यात आल्याचा दावा मिडीया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. देव आनंद यांचा मुंबईतील जुहू येथील बंगला एका रिअल इस्टेट कंपनीतील एका बिल्डरला 400 कोटींना विकण्यात आला असल्याचं बोलल जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सर्व करार झाला असून कागदोपत्री काम सुरू झाले आहे. हा बंगला 350-400 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. इतकच नाही तर आता हा बंगला पाडून आता येथे 22 मजली उंच इमारत बांधली जाणार आहे.

देव आनंद यांचा हा बंगला 1950 मध्ये बांधला आला होता. ज्यावेळी जुहू हे एक लहानसे जंगलासारखे दिसणारे गाव असायचे. जेव्हा हा बंगला बांधला गेला तेव्हा ती जागा जास्त लोकप्रिय आणि विकसीत नव्हती असं म्हटलं जाते. एकेकाळी या बंगल्याजवळ माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया यांसारखे मोठमोठे बॉलिवूड स्टार राहायचे.

देव आनंद यांचा मुलगा सुनील अमेरिकेत राहतो, तर मुलगी देविना तिच्या आईसोबत उटी येथे राहते. हा बंगला विकण्याचे कारण म्हणजे या बंगल्याची देखभाल करण्यासाठी कुणी नाही. त्यामुळे हा बंगला विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्रातील पनवेल येथील त्यांची काही मालमत्ता देखील याच कारणामुळे विकण्यात आली होती.

देव आनंद यांचा मुलगा सुनील, मुलगी देविना आणि पत्नी कल्पना यांच्या नावावर हा बंगला आहे. आता या बंगल्याच्या जागेवर 22 मजली इमारत  बांधण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Rafael Nadal: 'राफा, तू टेनिसमधून ग्रॅज्युएट होतोय, मी अधिक इमोशनल होण्याआधी...', फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र

Latest Marathi News Updates : भाजपाला धडा शिकवणार- अनिल देशमुख

Health Tips For Men: पुरूषांनी स्वत:ला लावून घ्याव्यात या दहा सवयी, तरच रहाल फिट अन् फाईन

SCROLL FOR NEXT