Legendary singer Tina Turner dies at age 83 sakal
मनोरंजन

Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन..

83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

नीलेश अडसूळ

Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन झाले आहे. त्या ८३ वर्षाच्या होत्या. क्वीन ऑफ रॉक 'एन' रोल (the Queen of Rock 'n' Roll) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीना टर्नर (Tina Turner) यांनी त्यांच्या गाण्याने जगभरातील लोकांना प्रभावित केले होते.

गायक, गीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री आणि लेखिका अशा विविधांगी क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. टीना यांचे २४ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. स्वित्झर्लंडमधील झुरिचजवळील कुसनाच्त येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पब्लिसिस्ट बर्नार्ड डोहर्टी यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. याबाबतचे वृत्त People या नियतकालिकाने दिले आहे. त्यांच्या निधनाने हॉलीवुडवरती मोठी शोकळला पसरली आहे.

(Legendary singer Tina Turner dies at age 83)

अमेरिकन गायिका असलेल्या टीना ह्या १९९४ पासून त्यांचे पती आणि जर्मन अभिनेते एरविन बाख यांच्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये राहात होत्या. त्यांना २०१३ मध्ये स्विस नागरिकत्व मिळाले होते.

गेल्या काही वर्षांत त्या आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. याशिवाय अनेक इतर आजार त्यांना जडले होते. किडनी निकामी झाल्याने त्यांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता होती.

टर्नर यांनी १९५७ मध्ये 'आयके टर्नरच्या किंग्स ऑफ रिदम'मधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. रॉक संगीत क्षेत्रात त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली. टर्नर यांनी चार दशकांत बिलबोर्ड टॉपमध्ये ४० हिट्स मिळवले.

आजवर यांना १२ ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आठ स्पर्धात्मक पुरस्कार, तीन ग्रॅमी हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि एक ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार यांचा समावेश आहे. रोलिंग स्टोनच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय कलाकार आणि पहिल्या महिला होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?

Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

Ulhasnagar Assembly Election : आयलानी यांचा जीव भांड्यात! योगी आदित्यनाथ यांची मीरा भाईंदरच्या सभेतून कुमार आयलानी यांच्यासाठी हाक

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT