leo hindi poster thalapathy vijay and sanjay dutt lokesh kanagaraj SAKAL
मनोरंजन

Leo Hindi Poster: आता थलपतीला भिडणार संजय दत्त, लिओ च्या हिंदी पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

लोकेश कनगराजच्या लिओ सिनेमाचं हिंदी पोस्टरमध्ये संजय दत्त झळकतोय

Devendra Jadhav

Leo Hindi Poster News: लिओ सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. लोकेश कनगराज यांच्या विक्रम युनिव्हर्स मधल्या लिओ सिनेमाने सुरुवातीपासूनच चर्चा होती.

थलापती विजयच्या लिओ सिनेमाचं हिंदी पोस्टर रिलीज झालंय. या पोस्टरमध्ये संजय दत्त आणि थलापती विजयमध्ये कॉंटे की टक्कर दिसून येतेय.

लिओचा धमाकेदार पोस्टर

लिओ पोस्टरमध्ये विजय रागाने संजय दत्तचा चेहरा त्याच्या हातात धरताना दिसतोय. पोस्टरवर त्याच्यासोबत एक कॅप्शन लिहिलं आहे, जे विजयने ट्विटर पोस्टच्या कॅप्शनमध्ये देखील लिहिले आहे. तो लिहितो, "शांत राहा आणि सैतानाचा सामना करा."

विजय चेहरा पकडताना संजय त्याच्याकडे हसत शांतपणे बघतोय. अशाप्रकारे KGF 2 नंतर संजय दत्त लिओच्या माध्यमातुन पुन्हा एकदा खलनायक बनून समोर येतोय.

'लिओ'ची कास्ट आणि रिलीज डेट

थलपथी विजय आणि संजय दत्त व्यतिरिक्त, लिओमध्ये त्रिशा, मिस्किन, गौतम वासुदेव मेनन, अनुराग कश्यप, अर्जुन आणि मन्सूर अली खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट डेव्हिड क्रोननबर्गच्या 'अ हिस्ट्री ऑफ व्हायोलेन्स' (2005) चा रिमेक असल्याची अफवा आहे.

मात्र, सेव्हन स्क्रीन स्टुडिओचे एसएस ललित कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'लिओ' 19 ऑक्टोबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT