Thalapathy Vijay breaks shah rukh khan top opening record uk : साऊथमधील चित्रपट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावऱण आहे. त्याला कारणही तसेच आहे. थलापती विजयचा लिओ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्साहाचा आणि कुतूहलतेचा विषय होता. या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत.
गेल्या महिन्यात शाहरुखचा जवान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यानं आतापर्यत सातशे कोटींची कमाईही केली होती. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत विजय सेतुपति, दीपिका पदुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. आगामी काळात जवानचा दुसरा भाग येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?
सध्या सोशल मीडियावर थलापती विजयच्या लिओ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याला चाहत्यांचा मिळणारा प्रतिसादही जबरदस्त आहे. केवळ साऊथच नाहीतर उत्तर भारतातही त्याच्या नावाची क्रेझ मोठी आहे. त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तो आता लिओ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. लिओ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या नावावर वेगवेगळ्या विक्रमांची नोंद झाली आहे.
थलापती विजयचा लिओ हा पॅन इंडिया प्रोजेक्ट असून तो हिंदी, तमिळ, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे अॅडव्हान्स बूकींगला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विजयच्या लिओनं अॅडव्हान्स बूकींगमध्ये शाहरुखच्या पठाणला मागे टाकले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. परदेशात थलापतीच्या लिओला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानं पठाणचं रेकॉर्ड ब्रेक केले आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त आज तकनं दिले आहे.
लोकेश कनगराजनं लिओचे दिग्दर्शन केले असून त्यानं यापूर्वी केथी, विक्रम चित्रपटातून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यानंतर तो आता लिओमधून प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. उद्या प्रदर्शित होणाऱ्या लिओनं युकेमध्ये आतापर्यत सर्वाधिक अॅडव्हान्स बूकींग केली आहे. युके मध्ये सर्वाधिक ओपनिंग भारतीय चित्रपट म्हणून आता लिओचे नाव घेतले जात आहे.
यापूर्वी ही कामगिरी शाहरुखच्या पठाणनं केली होती. पठाणनं पहिल्याच दिवशी ३ लाख १९ हजार पाउंडस (३ कोटी २२ लाख) ची कमाई केली होती. तर लिओनं ३ लाख २० हजार पाऊंड्स ( ३ कोटी २३ लाख) एवढी कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.