Multiplex In Jammu & Kashmir : काश्मीर खोऱ्यातील नागरिकही आता बॉलिवूडचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहू शकणार असून, तब्बल तीस वर्षांनंतर येथे मल्टिप्लेक्सची सुरूवात झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्याची येथील नागरिकांची सुप्त इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज श्रीनगरमधील सोनमर्ग येथे पहिल्या मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलचे उद्घाटन केले. आजपासून या मल्टिप्लेक्समध्ये आमिर खानचा स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगने नागरिकांसाठी हे चित्रपटगृह खुले केले जाणार आहे. तर, 30 सप्टेंबरपासून येथे नियमित शो सुरू केले जाणार आहे.
काश्मीरच्या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये एकूण ५२० आसनक्षमतेचे तीन सिनेमागृह असणार आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने परिसरात फूड कोर्टही असणार आहे. मल्टिप्लेक्सचे उद्घाटन करताना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, या प्रसंगी मी दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर विज्ञान जर शोध असेल तर, कला ही त्याची अभिव्यक्ती असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्यावर जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ते काम चुकीच्या पद्धतीने केले. मात्र, आता काळ बदलत आहे.
चित्रपटासाठी 300 किमीचा प्रवास
काश्मीरमध्ये सिनेमा हॉल बंद झाल्यामुळे अनेक तरुणांना सिनेमा हॉल म्हणजे काय आणि मल्टिप्लेक्स म्हणजे काय हे देखील माहित नाहीये. तर,अनेकांना त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी थोडे थोडके नव्हे तर, 300 किमीचा प्रवास करून जम्मूमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घ्यावा लागत होता.
1990 मध्ये दहशतवादी संघटनांच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे काश्मीरमधील सर्व सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. दहशतवादाच्या काळात खोऱ्यातील एकामागून एक 19 सिनेमागृहे बंद करण्यात आले होते. त्यापैकी रीगल, पॅलेडियम, खयाम, फिरदौस, शाह, नाझ, नीलम, शिराझ आणि ब्रॉडवे ही नऊ सिनेमागृहे एकट्या श्रीनगरमध्ये होती. लाल चौकाजवळील पॅलेडियम आणि त्यापासून काही अंतरावर असलेला नीलम सिनेमा हॉलमध्ये मोठी गर्दी असायची. मात्र, दहशतवादी संघटनांच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे ते बंद करण्यात आले होते.
1999 मध्ये फारुख अब्दुल्ला सरकारने रिगल, नीलम आणि ब्रॉडवे उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु सप्टेंबरमध्ये रिगलवर ग्रेनेड हल्ला झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर ते रिगलवर लॉक झाले. रिगल आणि ब्रॉडवे सुरक्षेखाली चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दर्शकांची संख्या कमी झाल्यामुळे ते बंद करावे लागले. लष्कराच्या प्रयत्नाने अनंतनागमध्ये स्वर्ग सिनेमागृह सुरू करण्यात आले, पण नंतर तेही बंद करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.