Phulala Sugandh Maticha 
मनोरंजन

'फुलाला सुगंध मातीचा' अडचणीत; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

संपूर्ण प्रकरणावर मालिकेच्या कलाकारांचा, निर्मात्यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' Phulala Sugandha Maticha ही मालिका अडचणीत सापडली आहे. 'येस व्ही एक्झिस्ट' या LGBTQIA+ संघटनेच्या सदस्यांनी मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार केली आहे. या मालिकेतील 'सँडी' या तृतीयपंथीय पात्राला दिलेल्या वागणुकीवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या मालिकेला आजवर चांगली लोकप्रियता मिळाली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका अनेकदा अग्रस्थानी असलेली पाहायला मिळाली. मात्र आता मालिकेत दाखवलेल्या काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला जात आहे. (LGBTQIA group slams Marathi TV show Phulala Sugandha Maticha over a character portrayal)

नेमकं काय आहे प्रकरण?

या मालिकेत काही दिवसांपूर्वीच सँडी या नवीन पात्राची एंट्री झाली. ३१ मे रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सँडीला हीन दर्जाची वागणूक देण्यात आली होती. त्याच्या हातातील बांगड्या आणि गळ्यातील हारवरून त्याला सुनावण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे त्याला विविध आक्षेपार्ह नावांनी संबोधले गेले. या सर्व गोष्टींमुळे तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप 'येस व्ही एक्झिस्ट' या LGBTQIA+ संघटनेच्या सदस्यांनी केला आहे.

एकीकडे प्राइड मंथ साजरा केला जात असताना दुसरीकडे मालिकांमधून असे दृष्य दाखवणे चुकीचं असल्याचं मत संघटनेचे संस्थापक इंद्रजीत घोरपडे म्हणाले. 'महाराष्ट्रातील विविध भागांतील लोकांनी आमच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. संबंधित एपिसोडवर आमचा आक्षेप आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश पोहोचतो. तृतीयपंथीयांविरोधातील भावना यामुळे आणखी बळावेल अशी शंका आहे. हे चुकीचं असल्याने आम्ही इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनकडे याबद्दल तक्रार नोंदवली आहे', असं ते 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हणाले.

'फुलाला सुगंध मातीचा' ही 'दिया और बाती हम' या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. सध्या राजकोटमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर मालिकेच्या कलाकारांनी किंवा निर्मात्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT