Liger movie review  esakal
मनोरंजन

Liger Twitter Review: लायगरचा बार 'फुसका'! प्रेक्षकांची नाराजी

लायगरच्या ट्रेलरनं तर प्रेक्षकांवर जादू केली होती. त्यातील विजयचा परफॉर्मन्स, अनन्याची दिलखेचक अदा, गाणी, संगीत आणि संवाद यामुळे प्रेक्षकांना लायगरचे वेध लागले होते.

युगंधर ताजणे

‘Liger’ Twitter review: प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती तो विजय देवराकोंडाचा लायगर प्रदर्शित झाला आहे. त्यात अनन्या पांडे मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आहे. सध्या टॉलीवूड (Tollywood Vs Bollywood) विरुद्ध बॉलीवूड असा संघर्ष पेटला असताना त्यात प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाकडे प्रेक्षक गांभीर्यानं पाहत आहेत. त्यामुळेच की बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद इतर चित्रपटांच्या तुलनेत संथ (Entertainment News) असल्याचे दिसून आले आहे. साऊथमधला प्रसिद्ध अभिनेता विजय हा पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये काम करतो आहे. लायगरकडून प्रेक्षकांना (Bollywood Movies) मोठया अपेक्षा आहे. सोशल मीडियावर आलेल्या रिव्ह्युमध्ये तर त्यानं प्रेक्षकांची निराशा केल्याच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

लायगरच्या ट्रेलरनं तर प्रेक्षकांवर जादू केली होती. त्यातील विजयचा परफॉर्मन्स, अनन्याची दिलखेचक अदा, गाणी, संगीत आणि संवाद यामुळे प्रेक्षकांना लायगरचे वेध लागले होते. प्रत्यक्षात लायगरचा बार फुसका असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. जगन्नाथ पुरी यांचं दिग्दर्शन असलेल्या लायगरला तेलुगूमध्ये चांगलं अॅडव्हान्स बुकिंग मिळाल्याचे दिसून आले आहे. मात्र हिंदी प्रेक्षकांना लायगर फारसा भावलेला नाही. लायगरचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्य़ानंतर त्याच्याविषयीच्या रिव्ह्युला उधाण आले आहे. त्यात प्रेक्षकांनी या चित्रपटानं आपली निराशा केल्याचे म्हटले आहे. युएसच्या फिल्म क्रिटिक वेंकीनं म्हटलं आहे की, लायगर हा आणखी चांगला रंगला असता मात्र तसे झाले नाही. त्याचे लेखन हे दमदार नाही. आणि फिल्ममध्ये अॅक्शन जो भडिमार केला आहे त्यामुळे त्याची रंगत कमी झाली आहे.

विजयचा अभिनय आणि त्याचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन याचे कौतूक झाले आहे. मात्र चित्रपटात बोलताना त्याचे सतत अडखळणे हे काही प्रेक्षकांना आवडलेले नाही. अनन्याची भूमिका उत्तम झाल्याचे सांगण्यात येत आहे. असं असलं तरी लायगर हा काही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत नसल्याचे दिसून आले आहे. तेलुगू व्हर्जन पाहिल्यानंतर एका युझर्सनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो की, विजयच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनशिवाय या चित्रपटामध्ये काहीही नाही. चित्रपटात कुणीही व्हिलन नाही. पहिला भाग थोडा रंजन नक्कीच आहे. मात्र मध्यंतरानंतर लायगर कमालीचा कंटाळवाणा होतो.

लायगर हा पॅन इंडियाच्या प्रोजेक्टनुसार चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात वर्ल्ड फेमस बॉक्सर माईक टायसन यांचा कॅमिओ दाखवण्यात आला आहे. तो प्रेक्षकांना भावला आहे. तब्बल पाच संगीतकारांनी मिळून लायगरचे संगीत दिले आहे. ते काही अंशी प्रेक्षकांना भावले आहे. पुढील दिवसांत लायगरचे भवितव्य ठरणार आहे. त्याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT