Liger stars Vijay Deverakonda and Ananya Panday travel in local train to beat the Mumbai  Esakal
मनोरंजन

Video: मुंबई लोकलमध्ये अनन्या-विजय देवरकोंडाला चक्क झोपायला मिळाली जागा

आपल्या आगामी 'लाइगर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)आणि अनन्या पांडेच्या(Ananya Pandey) लाइगरचा (Liger) ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला लोकांनी भलतच पसंत केलं आहे. विजय देवरकोंडाची अॅक्शन आणि अनन्यासोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडलेली दिसत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये आणि अनन्या पांडेचं साऊथमध्ये पदार्पण होत आहे. दोघांनीही या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीच कसर ठेवलेली नाही. नुकतेच हे दोघे बान्द्रा परिसरात प्रमोशन करताना दिसले. या दरम्यान त्यांनी मुलांसोबत डान्सही केला.(Liger stars Vijay Deverakonda and Ananya Panday travel in local train)

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेनं मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी थेट मुंबई लोकलने प्रवास केला. अर्थात नेहमीच आपल्या बड्या गाड्यांमधून फिरणारे सेलिब्रिटी जेव्हा ट्रेनमधून प्रवास करतात तेव्हा चर्चा तर होणारच नाही का. या दोघांचे बान्द्रयाच्या प्लॅटफॉर्मवर बसून ट्रेनची वाट बघतानाचे तसेच ट्रेनमधले फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

आता तसं पाहिलं तर अनन्या मुंबईची राहणारी आहे,पण याआधी देखील तिनं कधी मुंबईच्या लोकलने प्रवास केला असेल याबाबतीत थोडा डाऊटच आहे. पण मुंबई लोकल मात्र अनन्या मुंबईकर असल्याने तिच्या थोडीबहुत परिचयाची तर नक्कीच असणार. तिला तिच्यातील गर्दीची ऐकून का होईना पण कल्पना असणार. पण विजयसाठी हा प्रवासच एक नवीन अनुभव होता.

विजयचा लाइगर सिनेमा २५ ऑगस्ट,२०२२ रोजी रिलीज होणार आहे, हा सिनेमा हिंदी तेलुगु,तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. विजय आणि अनन्या लाइगरचं प्रमोशन करण्यासाठी नुकतेच करणच्या कॉफी विथ करण ७ मध्ये हजेर राहिले होते. त्या दरम्यान दोघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. लव्ह लाईफ आणि सेक्स लाईफवर दोघांनी केलेली वक्तव्य सध्या चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT