Kangana Ranaut Google
मनोरंजन

'विवाहित पुरुष तरुण मुलींना कसे फसवतात'; कंगनानं सांगितलं 'हृतिक स्कॅंडल'

'लॉकअप' शो दरम्यान कंगनानं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील स्कॅंडल विषयी हृतिक रोशनचं नाव न घेता मोठं भाष्य केलं आहे.

प्रणाली मोरे

कंगनाच्या (Kangana Ranaut) 'लॉकअप'(Lockup) शो मध्ये कंटेस्टंट्समधील भांडणं आता फक्त शो चा भाग राहिली नाहीत तर ती चव्हाट्यावर आली आहेत. एकेका कंटेस्टंटचे वैयक्तिक आयुष्यातील अनुभव ऐकले तरी चक्रावून गेल्यासारखं होत आहे. इतकं सारं भयानकही वाटतंय कधीकधी. असो. पण आता शो ला कंट्रोल करणाऱ्या कंगनानंही या तापलेल्या भांडणाच्या तव्यावर आपलीही पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्न केला आहे. म्हणजे तिनं तिच्या मनातली भडासच ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा घेत काढलीय म्हणूया न. आता कंगना आणि हृतिक(Hrithik Roshan) मध्ये वारंही जात नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. कंगनाच्या म्हणण्याप्रमाणे हृतिक आणि ती काही वर्षांपूर्वी डेट करीत होते जेव्हा हृतिक सुझैनसोबत लग्नबंधनात होता. पण त्यावेळी हृतिकनं आपल्याला फसवलं असे आरोप कंगना अजूनपर्यंत करत आहे. याआधी त्यांच्यातील वादावादी कंगनानं सार्वजनिकही केली होती. पण आता पुन्हा थेट 'लॉकअप' शो मध्ये कंगनानं हृतिकचं नाव न घेता आपणही कसे एकेकाळी लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडलो होतो आणि भरडले गेलो याचं उदाहऱण दिलं आहे. आता तिने नाव घेतलं नसलं तरी तिचा इशारा कोणाकडे होता बोलताना हे मात्र प्रत्येकाला कळले. ती म्हणाली,''विवाहीत पुरुषांच्या प्रेमात पडलेल्या अविवाहीत तरुणींची नेहमीच अवहेलना होते. आपल्या आयुष्यातला तो मोठा स्कॅंडल होता'' असंच चक्क कंगना म्हणाली आहे.

'लॉकअप' मध्ये मुन्नावर फारुकीच्या एका फोटोवरुन कंगनानं आपलं रामायण सांगायला सुरुवात केली. त्याचं झालं असं की मुन्नावरचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. ज्यात तो एक बाई आणि मुलासोबत दिसला होता. कंगनानं त्याविषयी त्याला स्पष्टिकरण द्यायला सांगितलं होतं. तेव्हा त्यानं त्यावर आपण बोलू इच्छित नाही असं सांगून विषय टाळायचा प्रयत्न केला. मला सोशल मीडिया किंवा 'लॉकअप' च्या शो मध्ये देखील या फोटोवर बोलायची इच्छा नाही. किंवा यासाठी हे योग्य प्लॅटफॉर्म नाही,असं मुन्नावर म्हणाला.

त्यानंतर कंगना म्हणाली,''जेव्हा एखादी मुलगी विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडते,तेव्हा तिला त्याचा आयुष्याचा अनुभव,समज आणि जबाबदारी पेलणं हे त्याच्यातले गुण अधिक आवडतात. आणि मग ती त्याच्या प्रेमात सहज पडते. हे मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरुन सांगते''. पुढे कंगना म्हणाली,''ते विवाहीत पुरुष प्रकरण महाग पडेल असं वाटल्यावर मग स्वतःची एक गोष्ट बनवतात,आणि मग जगाला सांगत सुटतात की मला फसवलं गेलं,मी काहीच केलं नाही.वगैरे,वगैरे..आणि ही एकच गोष्ट ते आपल्या बायकोला आणि त्या फसवलेल्या तरुण मुलीला सांगतात''. तेव्हा मुन्नावरनं कंगनाला थांबवत सांगितलं की माझ्याबाबतीत वेगळं घडले आहे.

तेव्हा कंगना मुन्नावरला म्हणाली, ''मी तुझ्याविषयी किंवा कोणत्या एखाद्या दुसऱ्या तरुण मुलीविषयी नाही तर माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या मोठ्या स्कॅंडलविषयी बोलतेय. मी फक्त माझ्याबाबतीत जे घडलं ते दुसऱ्या कुणा मुलीसोबत घडू नये म्हणून हे सांगतेय. ते विवाहीत पुरुष आपण कसे बायकोचा त्रास सहन करतोय,आणि त्याला त्या त्रासातून ती तरुण मुलगीच कसं सोडवू शकते असं भावूक वातावरण तयार करतात. ती मुलगीच त्याला वाचवू शकते बायकोच्या जाचातून असं त्या मुलीलाही मग वाटू लागतं. पण जेव्हा तुम्ही त्याच्या बायकोची बाजू ऐकाल तर तुम्हाला मोठा धक्का बसेल हे नक्की''.कंगना पुढे मुन्नावरला म्हणाली,''अशा गोष्टींवर एक तर तुम्ही तुमची बाजू मांडा किंवा शांत बसा,सोडून द्या हे दोन पर्याय उरतात. तेव्हा तुला जर संधी मिळतेय तुझी बाजू मांडायची तर सगळं स्पष्ट कर''. तेव्हा कुठे जाऊन मुन्नावर म्हणाला,''फोटोतील ती आणि मी एक वर्ष झालं वेगळं राहतोय आणि आता कोर्टात केस सुरु आहे''. काहीही असलं तरी मुन्नावरच्या नावावर कंगनानं हृतिकविरोधात पुन्हा वाकड्यात शिरायची संधी सोडली नाही हे मात्र खरं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT