कंगना रनौतच्या(Kangana Ranaut)'लॉकअप' (LockUpp)चा आता फिनालेच्या(Finale)दिशेनं प्रवास सुरु झाला आहे. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती विनर ट्रॉफी कोण पटकावणार या क्षणाची. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी 'लॉकअप' शो सुरु झाला आणि जेलर करण कुंद्राच्या देखरेखीखाली वादविवाद,टोकाची भांडणं अन् धक्कादायक वक्तव्यांचा अत्याचारी खेळ प्रत्येक एपिसोडगणिक रंगताना दिसला. 'लॉकअप' मधील एलिमिनेशन ड्रामा आणि नव्या ट्वीस्टनी प्रेक्षकांना त्याच्याशी जोडून ठेवण्याचं काम आतापर्यंत उत्तम पार पाडलं आहे. लॉकअप' मधला प्रेक्षकांना आवडणारा भाग म्हणजे, शो मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ नये यासाठी जेव्हा कंटेस्टंट आपल्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक सीक्रेट्स सर्वांसमोर सांगतात. आतापर्यंत या शो मध्ये जेवढे सीक्रेट कंटेस्टंट्सनी सांगितले ते सारेच बातमीपत्राची हेडलाइन बनले आहेत. अर्थात काही सीक्रेट्सनी तर प्रेक्षकांना जबरदस्त धक्काही दिला. (Lock Upp Finale)
शो अधिक मसालेदार तेव्हा बनला जेव्हा प्रिन्स नरुलाची एन्ट्री झाली. प्रिन्स नरुला जेलमध्ये आल्यापासूनच दुसऱ्या कंटेस्टंटसाठी त्रास ठरतोय. खरोखरचं 'लॉकअप' चा प्रवास याआधी कधीही न पाहिलेला मनोरंजक अनुभव ठरत आहे. शो आता त्याच्या अंतिम टप्प्याच्या दिशेनं प्रवास करतोय. आता चालाखीनं खेळात बदल करणं,नवी रणनीती आखण्यावर कंटेस्टंट अधिक भर देताना दिसतील. नुकत्याच झालेल्या एका भागात शिवम शर्मानं अंजली अरोराला नमवत 'टीकट टू फिनाले' च्या टास्कमध्ये जिंकत फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. आता यानंतर पुढचं फिनालेचं तिकीट कोणाच्या पदरात पडतंय याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. (lock upp finale)
'लॉकअप' शो नं खूप कमी वेळात २००+ मिलियन व्हयुवर्सचा टप्पा गाठत यश मिळवलं आहे. MX Player आणि ALT Balaji या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी 'लॉकअप' शो ची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरत आहे. शो आता फिनालेच्या दिशेनं प्रवास करीत आहे,आता अधिक रंजक वळणं,कदाचित अधिक धक्कादायक सीक्रेट्सही प्रेक्षकांसमोर येतील. शो चे निर्माते प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी यावर मेहनत घेत आहेत. फिनालेत पोहोचण्यासाठी आता जेलमधील हे कैदी कोणते नवीन ट्वीस्ट आणतील आणि काय गेमप्लॅन आखतील हे येणाऱ्या काळात कळेलच. तोपर्यंत 'टीकट टू फिनाले' मध्ये कोणता कंटेस्टंट एन्ट्री करेल याचा अंदाज चाहते लावू शकतात. अर्थात त्यातही एक वेगळीच गंमत दडलेली असते.
MX Player आणि ALT Balaji वर लॉकअप शो लाइव्ह पाहता येत असून, प्रेक्षकांना कंटेस्टंटशी थेट संवाद साधण्याची देखील परवानगी आहे. २७ फेब्रुवारी,२०२२ पासून MX Player आणि ALT Balaji ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'लॉकअप' शो लाईव्ह पाहता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.