Lookback 2023 Marathi Movies: २०२३ हे वर्ष लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल. हे वर्ष संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. २०२३ हे वर्ष मराठी मनोरंजन विश्वासाठी चांगलं राहिलं. अनेक मराठी सिनेमे प्रेक्षक - समीक्षकांच्या नजरेत नावाजले गेले.
२०२३ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी भन्नाट गेलंय. या वर्षी मराठी सिनेमांनी थेट बॉलिवूडला टक्कर दिलीय. कोणते सिनेमे यावर्षी गाजले. घेऊया एक आढावा.
'वेड' हा रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा सिनेमा डिसेंबर २०२२ ला रिलीज झालेला. पण हा सिनेमा २०२३ जानेवारीपर्यंत थिएटरमध्ये झळकत होता. वेडने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केलीय .
परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमा जानेवारी २०२३ मध्ये रिलीज झालेला. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अनपेक्षितरित्या चांगलं यश मिळवलं. या सिनेमात स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, सुबोध भावे, अनिता दाते या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या सिनेमाची गोष्ट आणि सिनेमाच्या क्लायमॅक्सची खुप चर्चा झाली.
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमा या वर्षातला बहुचर्चित सिनेमा होता. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत या सिनेमाची खुप चर्चा झाली. सिनेमाचं संगीत अजय - अतुल यांनी दिलं होतं. सिनेमाची गाणी प्रचंड गाजली. पण सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. अंकुश चौधरी, सना शिंदे यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. शिवराज अष्टकमधील सुभेदार हा पाचवा सिनेमा होता. या सिनेमात अजय पुरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळाला
२०२३ मधला सर्वात यशस्वी सिनेमा म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा. बाईपण भारी देवा हा मराठी सिनेसृष्टीतील आजवरचा जास्त कमाई करणारा ठरला. बाईपण भारी देवा सिनेमाने कमाईच्या बाबतीत वेड, सैराट सिनेमाला मागे टाकले. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने या कलाकारांनी भुमिका साकारल्या.
आत्मपॅफ्लेट सिनेमा हा या वर्षातला महत्वाचा सिनेमा ठरला. वेगळा विषय, हटके संवाद आणि कलाकारांचा अभिनय अशा जोरावर आत्मपॅफ्लेट सिनेमाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. आशिष भेंडे या तरुणाचा आत्मपॅफ्लेट हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. परेश मोकाशींनी या सिनेमाचं वेगळंच निवेदन केलं. प्रेक्षक - समीक्षकांना दोघांनाही हा सिनेमा आवडला.
२४ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या झिम्मा 2 सिनेमाने थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी मिळवली आहे. झिम्मा 2 सिनेमा हा गाजलेल्या झिम्मा चा सेकंड भाग. पुन्हा एकदा झिम्मा 2 च्या माध्यमातुन मराठी पोरींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हा सिनेमा अजुनही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी मिळवण्यात यशस्वी झालाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.