Madhubala Biopic: बॉलीवूडमध्ये(Bollywood) वादांना काही कमतरता नाही. आता पुन्हा एक नवीन वाद पेटण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला(Madhubala) यांच्या बायोपिकवरनं(Biopic) हा वाद(Controversy) सुरु झाला आहे. कारण मधुबाला यांच्यावर बायोपिक यावा अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा नाही. म्हणूनच त्यांची बहिण मधुर भूषण गेल्या काही दिवसांपासून मधुबाला यांच्यावरील बायोपिकला नकारघंटा देत आपल्या मतावर अडून बसल्यात. आता सिनेमाचे निर्माते पद्मिनी कोल्हापुरे यांचे पती टुटू शर्मा आणि मधुर भूषण यांच्यात मधूबाला यांच्या बायोपिक वरनं खडाजंगी सुरु आहे. 'मधुबाला- दर्द का सफर' या मधुबाला यांच्यावरील पुस्तकाचे राइट्स शर्मा यांनी नावावर करुन घेतले आहेत. बायोपिकवरनं विरोध सुरु असला तरी निर्माते मात्र अद्याप तरी आपल्या विचारांवर ठाम आहेत.(Madhubala Biopic: Tutu Sharma's rejoinder to Madhur Bhushan's objection)
काही दिवसांपूर्वी मधुबाला यांच्या बहिणीनं म्हणजे मधुर भूषण(Madhur Bhushan) यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडत म्हटलं होतं,''कुणीही त्यांच्या परवानगीशिवाय मधुबाला यांच्या आयुष्यावर सिनेमा काढू शकत नाही''. त्यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत करताना म्हटलं होतं की,''जर लोकांनी माझ्या विनंतीला ऐकलं नाही तर माझ्याकडे त्याविरोधात कायदेशीर रित्या विरोध करण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. मधुबाला हा आमच्या भावनेचा विषय आहे. तेव्हा आमच्या भावनांना जर कोणी छेडलं किंवा आम्हाला त्यासंबंधित त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्या विरोधात कारवाई करु. जो कोणी मधुबाला वर माझ्या परवानगीशिवाय बायोपिक काढेल त्याला मी कोर्टात खेचीन. मी शेवटपर्यंत याविरोधात लढा देईन''.
पण या संदर्भात मधुबाला यांच्यावर बायोपिक काढणाऱ्या टुटू शर्मांशी(Tutu Sharma) संपर्क साधला असता ते म्हणाले, ''मधुबाला यांच्यावर बायोपिक काढण्याच्या तयारीत ते आहेत''. ते म्हणाले,''मधुबाला यांच्यावर आधारित 'मधुबाला-दर्द का सफर' या पुस्तकावर आधारित माझा सिनेमा असणार आहे. मधुबाला- दर्द का सफर हे पुस्तक सुशिला कुमारी यांनी खूप वर्षांपूर्वी लिहिलं आहे. मधुबाला या प्रसिद्ध पब्लिक फिगर होत्या. आणि लोकांपर्यंत त्यांची लाइफस्टोरी पोहोचायला हवी. आणि मला जेवढा कायदा माहितीय त्यानुसार कोणीही पब्लिक फिगरवर आपला वैयक्तिक हक्क सांगू शकत नाही,अगदी त्यांचे कुटुंबिय देखील. आपल्याकडे इतके बायोपिक बनले आहेत पण कोणीच अशा पद्धतीनं विरोध केलेला नाही. पण जसं मधुबाला यांच्या बायोपिकला विरोध केला जातोय त्यामुळे मी देखील यासंदर्भात माझ्या लीगल टीमशी संपर्कात आहे''.
''मधुबाला यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी कोणाही त्यांच्या परिचित व्यक्तिशी संपर्क साधलेला नाही. मी जे काही करणार आहे ते संपूर्ण त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाच्या आधारे. आणि पुस्तक हे मधुबाला यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं कथन करतो. बघूया, यामध्ये कोण जिंकतं''.
मधुर भूषण विरोधात टुटू शर्मा हा वाद जोरदार पेट घेईल सध्या असंच वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच ऐकण्यात आहे की मधुबाला यांच्यावरील बायोपिकचे शूट टूटू शर्मा यावर्षीपासूनच सुरू करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.